News Flash

सातारा-पसरणी घाटात ट्रकचा ब्रेकफेल; दुचाकीला चिरडले, एक ठार

दुचाकी ट्रकच्या चाकाखाली चिरडली गेली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा जिल्ह्यातील पसरणी घाटात ट्रकचा ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला तर एक जण जखमी आहे. ही घटना गुरूवारी सकाळच्या सुमारास घडली. अपघातामुळे वाई-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

सातारा पसरणी घाटातून ट्रक जात असताना अचानक ट्रकचे ब्रेक निकामी झाले. ट्रक उतारावर होता. त्याचवेळी एक दुचाकीस्वार ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. दुचाकी ट्रकच्या चाकाखाली चिरडली गेली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ट्रक उतारावर होता. तो घाटाच्या कठड्याला धडकला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिसांकडून वाहतूक सुरळित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 10:32 am

Web Title: satara pasrani ghat truck break fail bike rider dies
Next Stories
1 पती चारित्र्यावर संशय घ्यायचा, पत्नीने मटणात विष टाकून केली हत्या
2 अयोध्येचा प्रश्न कश्मीरसारखा बनू नये – उद्धव ठाकरे
3 शिक्षकी पेशातील शेतकऱ्याची वाइन उद्योगात भरारी
Just Now!
X