News Flash

हातावर गोंदल्याच्या खुणेवरून मांढरदेव गडावरील महिलेच्या हत्येची पोलिसांनी केली उकल

मांढरदेव परिसरात एका महिलेची पाच दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. या हत्येची उकल करण्यासाठी पोलिसांना महिलेच्या हातावर गोंदलेल्या नावाची मदत झाली

प्रतिकात्मक छायाचित्र

साताऱ्यातील मांढरदेवी गडावर १५ एप्रिलला एका २३ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. बानू गोपाळ कोकरे असे या हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. वाई तालुक्यातील मांढरदेव घाटात बानू कोकरेचा गळा चिरून तिची हत्या करण्यात आली. या महिलेच्या हातावर फक्त बानू असे गोंदलेले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. वाई परिसरातील हॉटेल आणि लॉजमध्ये जाऊनही पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. याप्रकरणी या महिलेच्या प्रियकरासह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी ही माहिती दिली.

बानू कोकरे ही मुंबईतील वरळी झोपडपट्टीत राहणारी होती. ही महिला आणि तिच्यासोबत एकजण असल्याचे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये समजले. बानू कोकरे या महिलेचे नाथा लवाटे या नालासोपारा येथे राहणाऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. सोशल मीडियावर या बानूचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना हे सगळे धागेदोरे सापडण्यास मदत झाली आणि पोलिसांनी बानूच्या प्रियकराला अर्थात नाथा लवाटेला ताब्यात घेतले.

नाथा लवाटे विवाहित आहे, त्याने फूस लावून बानूला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. बानू त्याच्या मागे लग्नाचा तगादा लावत होती. बानूशी लग्न झाले असते तर पहिल्या विवाहात अडसर आला असता हाच विचार करून नाथा लवाटेने मित्रांच्या मदतीने बानूच्या हत्येचा कट रचला. त्याने बानूशी विवाह केला त्यानंतर तिला मांढरदेव येथे काळूबाईच्या दर्शनासाठी आणले. तिथे नाथा लवाटेने त्याचे मित्र अजय धाईजे आणि रविंद्र शेडगे या दोघांनाही मांढरदेवला बोलावले होते. त्यानंतर मांढरदेव घाटात बानूला नाथा घेऊन गेला. तिथे मित्रांसह त्याने बानूची हत्या केली. पोलिस उपअधीक्षक अजित टिके पोलिस निरीक्षक विनायक वेताळ व पोलीस कर्मचारयांचा यात सहभाग राहीला. या हत्येच्या तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली होती. या पथकांसह मुंबई पोलिस व माळशिरसचे पोलिस उपअधीक्षक यांनी गुन्हे उघडकीस आणण्यात सहकार्य केले असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 11:26 pm

Web Title: satara police solves murder mystery of woman at mandhardevi gad
Next Stories
1 शिवसैनिकांच्या हत्येचं सत्र सुरुच, अहमदनगरनंतर आता भिवंडीत शिवसैनिकाची निर्घृण हत्या
2 अहमदनगर दुहेरी हत्याकांड: धमकी दिल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांची हत्या ?
3 ‘केसरी’च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार
Just Now!
X