News Flash

सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघात ५२ टक्के मतदान

सातारा-सांगली हा राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला आहे.

सेनेची मुख्यमंत्र्यांकडे कैफियत

पुणे, नांदेड, सातारा-सांगली, जळगाव, यवतमाळ आणि भंडारा-गोंदिया या विधान परिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात आज मतदान होत आहे. सहा जागांसाठी ३० उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी सातारा-सांगली मतदारसंघात आज सकाळपासूनच उत्साहात मतदान पार पडताना दिसत आहे. मात्र, सकाळच्या सत्राच्या तुलनेत दुपारपासून मतदानाने वेग घेतलेला दिसत आहे. मतदानाला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत ११.५८ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर  दुसऱ्या सत्रात या मतदारसंघातील आठ मतदान केंद्रांवर दुपारी १२ वाजेपर्यंत ५२.९८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सातारा-सांगली हा राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला, पण या वेळी या बालेकिल्ल्यातच धुसफुस सुरू झाली आहे. अजित पवार यांनी शेखर गोरे यांना पक्षात आणून उमेदवारी दिल्याने पक्षात नाराजीची भावना आहे. जयंत पाटील, उदयनराजे भोसले या साऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम हे रिंगणात आहेत. आधी सोपी वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीसाठी कठीण झाली. त्यामुळे २२ तारखेला होणाऱ्या मतमोजणीचा निकाल काय लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

whatsapp-image-2016-11-19-at-12-39-46

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 2:53 pm

Web Title: satara sangli vidhan parishad election
Next Stories
1 सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना क्लीनचिट, जप्त रक्कम ‘लोकमंगल’चीच!
2 मद्यपींना पुन्हा दोनच ‘बाटल्यां’ची मुभा!
3 नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र मतदान यंत्राची मागणी
Just Now!
X