News Flash

सातारा : खंबाटकी घाटात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह!

रात्रीच्या अंधारात हा मृतदेह घाटात टाकला गेल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली गेली आहे.

खंबाटकी घाटात यापूर्वीही अनेकदा मृतदेह आणून टाकण्याच्या घटना घडल्या आहेत

पुणे – सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जाळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला, या महिलेचा जाळून खून करुन मृतदेह घाटात टाकला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, या घटनेचा खंडाळा पोलिस तपास करीत आहेत .

खंबाटकी घाटाच्या पहिल्या वळणावर एक मृतदेह असल्याची माहिती खंडाळा पोलिसांना मिळाली घाटाच्या या वळणावर डाव्या बाजूच्या नाल्यात मृतदेह टाकल्याचे दिसून आले. पाहणी केल्यानंतर पायातील पैंजण व जोडवी यावरून साधारणपणे २० ते २५ वर्ष वयाच्या महिलेचा मृतदेह असल्याचे समोर येत असून तो अर्धवट जाळलेला असल्याचे दिसून आले .

रात्रीच्या अंधारात हा मृतदेह घाटात टाकला गेल्याची शक्यता आहे . दुपारी तीन वाजेच्या सुमारास खंडाळा पोलिसांना वाटसरूंनी माहिती दिल्यानंतर पोलीस निरिक्षक महेश इंगळे, उपनिरिक्षक स्वाती पवार व पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. या परिसराची व मृतदेहाची प्राथमिक पाहणी करून त्यांनी तपास सुरू केला आहे .

खंबाटकी घाटात यापूर्वीही अनेकदा मृतदेह आणून टाकण्याच्या घटना घडल्या आहेत . विशेषतः पुणे, मुंबई येथील व्यावसायिक , ठेकेदार यांचाही त्यात समावेश होता . खंबाटकी घाटातील दाट झाडीचा व निर्जन जागेचा वापर अशा घटनांसाठी होत असतो . त्यामुळे पोलिसांना नेहमी सतर्क रहावे लागते . या घटनांपैकी अनेक घटनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

खंडाळा तालुक्यात लोणंद पोलीस स्टेशन हद्दीत दोनच दिवसापूर्वी कालव्यात सापडलेल्या मृतदेहाचा तपास करून खूनाचा शोध घेण्यात आला . त्यानंतर लगेचच खंबाटकी घाटात दुसरी घटना उघडकीस आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे . अधिक तपास पोलिस निरिक्षक महेश इंगळे करीत आहेत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 8:41 pm

Web Title: satara the partially burnt body of an unidentified woman was found in khambhatki ghat msr 87
टॅग : Crime News
Next Stories
1 महाबळेश्वर-पाचगणीतील पर्यटकांची गर्दी ‘मॅप्रो’ला पडली महागात; प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई
2 स्वबळाचा नारा देणाऱ्या नाना पटोलेंना अजित पवारांनी फटकारलं; म्हणाले…
3 “मुख्यमंत्रीपदाची फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही…,”; रामदास आठवलेंचा नाना पटोलेंना सल्ला
Just Now!
X