साताऱ्यातील ग्रेड सेपरेटर वर लावण्यात आलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे नाम फलक अज्ञात व्यक्तीने फाडल्यामुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जमवलेल्या गर्दीची चौकशी करणार असल्याचेही सांगितले आहे. त्याचबरोबर उदयनराजे यांनी केलेलं ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन सोशल मीडियामध्ये पाहिल्यानंतर समजले असून जर का विना परवानगी गर्दी आणि नियमांचे पालन झाले नसल्यास या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी पुन्हा नव्याने त्या ठिकाणी फलक लावला. त्यामुळे सातारा शहरातील तणावाची परिस्थिती निवळली आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. मंत्री देसाई म्हणाले, ग्रेड सेपरेटरचे नामकरण व उदघाटन शुक्रवारी झाले होते. थोर विभुतींची नावे या भुयारी मार्गाला दिली होती. त्यापैकी एका फलकाला इजा पोचविली आहे.

Nitesh Rane, T Raja
प्रक्षोभक भाषण प्रकरण : नितेश राणे, गीता जैन, टी. राजांविरोधात फौजदारी कारवाई करणार का ? उच्च न्यायालयाचा पोलीस आयुक्तांना प्रश्न
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही
sangli lok sabha marathi news, mla vinay kore marathi news
सांगलीत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाला मित्र पक्षाकडून आव्हान
Devendra Fadnavis criticizes the disgruntled and dissatisfied leaders of the party
“बसमध्ये जागा मिळाली नाही की बसमागे दगड मारत धावणारे असतात…”, देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले?

हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. मला हा प्रकार समल्यावर मी तातडीने सर्व पोलिस अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. तसेच अज्ञात व्यक्तीविरूध्द तातडीने गुन्हा दाखल करा असे सांगितले. तसेच संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याची सूचना पोलिसांना केली आहे. त्यामुळे शिवप्रेमी जनतेने शांतता राखावी आम्ही अशा विघातक प्रवृत्तींना शोधून काढून कठोर कारवाई करू. जनतेने शांतता राखावी, असे आवाहन मंत्री देसाई यांनी केले आहे.