News Flash

माफीचा साक्षीदार सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाला अन्…

तुम्हाला माहिती आहे का हे प्रकरण

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता वार्ताहर,

वाई: वाई धोम हत्याकांड प्रकरणाची सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असताना यातील माफीचा साक्षीदार असलेल्या ज्योती मांढरेला अचानक चक्कर आली. त्यामुळे कोर्टाचे काम पंधरा मिनिटे थांबवण्यात आले. यानंतर मांढरेच्या तब्येतीची विचारपूस करून पुन्हा सुनावणी सुरू केली. डॉ. संतोष पोळ याने वाई शहरासह आसपासच्या परिसरातील अनेकांचा खून केला. खून केल्यानंतर त्याने सहा मृतदेह धोम धरणालगत असलेल्या फार्म हाऊसमध्ये पुरून ठेवले. शेवटचा खून मंगल जेधे या महिलेचा केल्यानंतर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणातील ज्योती मांढरे व त्यानंतर डॉ. संतोष पोळ यांना अटक केली. ज्योती माफीची साक्षीदार झाली व डॉ. पोळ याने कशा पद्धतीने हत्या केल्या याची तिने माहिती दिली.

उलट तपासणीत संतोष पोळ याने जे सहा खून केले, ते कशा पध्दतीने केले त्याची सविस्तर माहितीही मांढरेने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. पोळ हा घोटावडेकर हॉस्पिटलमध्ये कंपाउंडर म्हणून कामाला होता. मात्र वैद्यकीय जुजबी ज्ञानामुळे तो पंचक्रोशीत डॉ. पोळ म्हणून प्रसिद्ध होता, असे ज्योती मांढरेने न्यायालयासमोर सांगितले. अजून काही महत्वाच्या उलट तपासणी होणार असून बराच काळ हा खटला चालणार असल्याचे उज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

सातारा जिल्हा न्यायालयात सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काम पाहत आहेत. दरम्यान, ज्योती मांढरे न्यायालयात असताना तिला अचानक चक्कर आली. ज्योतीला पाणी देऊन तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. न्यायालयाने दहा मिनिटांची विश्रांती घेत ज्योती ठीक असल्याची खात्री झाल्यावरच कामकाजाला सुरुवात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 9:36 pm

Web Title: satara vai news dr santosh pol serial killing case adv ujjwal nikam public prosecutor vjb 91
Next Stories
1 शक्ती कायद्यात अत्याचाराच्या खोट्या तक्रारी करणाऱ्या महिलांवर कारवाईची तरतूद- अनिल देशमुख
2 गडचिरोली: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला मोठं यश
3 अरे काय चाललंय काय?; धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील संतापले
Just Now!
X