05 April 2020

News Flash

उस्मानाबादमध्ये वृद्ध शेतकर्‍यावर सावकाराचा जीवघेणा हल्ला; जिल्ह्यात अवैध सावकारी बोकाळली

राज्याचा कारभार हाकणार्‍या मंत्रालयात उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या व्यक्तीने सावकारीचा व्यावसायातून तालुक्यातील धुत्ता, भंडारी, नांदुर्गा, टाकळी आदी गावातील जमिनी हडप केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. जमिनी

उस्मानाबाद : सावकाराकडून वृद्ध शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना येथे घडली आहे. मारहाणीनंतर शरीरावर उठलेले वळ दाखवताना शेतकरी.

राज्याचा कारभार हाकणार्‍या मंत्रालयात उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या व्यक्तीने सावकारीचा व्यावसायातून तालुक्यातील धुत्ता, भंडारी, नांदुर्गा, टाकळी आदी गावातील जमिनी हडप केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. जमिनी हडपणारा कालवश झाला असला तरी जमिनीची कागदपत्रे मात्र त्याच्या वारसाच्याच नावे असल्याने शेतकरी पुरते धास्तावले आहेत. जमीन परत मिळावी यासाठी शासनदरबारी दाद मागणार्‍या शेतकर्‍याला या अधिकाऱ्याच्या मुलांनी गुंडांकरवी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमी शेतकर्‍यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई येथे मंत्रालयात सेवेत असलेले सुभाष माने यांनी धुत्ता, नांदुर्गा, भंडारी, टाकळी या गावांतील ३० ते ३२ शेतकर्‍यांच्या १२५ एकरपेक्षा जास्त जमिनी हडप करून आपल्या नावेकरून घेतलेल्या आहेत. शेतकर्‍यांनी त्यांचे पैसे परत देऊन ही सावकाराने जमीन परत दिली नाही. दरम्यान, २०१२ साली सुभाष माने हा सावकार मरण पावला. मात्र, शेतकर्‍यांच्या जमिनीची रजिस्टरी मुलगा अमोल, अनिल, मेव्हणा तलाठी गहिनीनाथ जाधव आणि चंद्रप्रभा जाधव यांच्या नावे असल्याने जमिनीचा वाद उफाळला आहे. सध्या जमिनीचे मूळ मालक हेच जमीन कसतात. मात्र, रजिस्टरी माने कुटुंबाच्या नावे आहे.

पांडुरंग शिंदे व अन्य शेतकर्‍यांनी सावकरी कायद्याअंतर्गत जमीन परत मिळावी, यासाठी जिल्हा निबंधकांकडे अर्ज केला. त्यानंतर जमिनीचे पंचनामे करण्यात आले. या गोष्टीचा राग मनात धरून अमोल माने, अनिल माने यांनी सात ते आठ गुंडांसोबत पांडुरंग शिंदे, त्यांचा मुलगा आणि पुतण्या यांना काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. जखमींवर उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अत्याचारी सावकारावर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी शिंदे कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणात शेतकर्‍यांना न्याय मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2018 7:46 pm

Web Title: savarkar attacks on old farmer in osmanabad
Next Stories
1 ‘अजित पवारांनी मुख्यमंत्र्याची शिकवणी घेतल्यास जलसंधारणाचा पहिला विषय असेल’
2 शिवसेनेशी युती करणे ही भाजपाची अगतिकता : चंद्रकांत पाटील
3 ती वाक्ये ऐकवली असती तर शिवसेना तोंडावर पडली असती: मुख्यमंत्री
Just Now!
X