सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या आई सावित्रीआक्का शामराव पाटील  यड्रावकर (वय- ८२ ) यांचे आज (मंगळवारी) सकाळी ६.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. टाळेबंदीमुळे अंत्यविधी निवडक लोकांच्या उपस्थितीत पार पडला.

शिरोळ तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व, शरद सहकारी साखर कारखान्यास विविध संस्थांचे संस्थापक स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर यांच्या त्या पत्नी होत. शामराव पाटील यांच्या संघर्षमय राजकीय जीवनात त्यांनी मोलाची साथ दिली. त्या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्यांच्या पश्चात राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष स्वरूपा पाटील, माजी उप नगराध्यक्ष संजय पाटील -यद्रावकर,  पाच मुली, नातवंडे असा परिवार आहे.

mla subhash dhote
प्रियंका गांधींच्या सभेला मैदान मिळू नये म्हणून… आमदार सुभाष धोटेंच्या आरोपाने खळबळ
Eknath Shinde, Eknath Shinde kolhapur,
कडक उन्हात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मंडलिक, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; जोरदार शक्तिप्रदर्शन
bjp claim thane loksabha marathi news, thane lok sabha bjp marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार

स्वर्गीय सावित्री अक्कांना श्रद्धांजली व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे, याची जाणीव आहे. परंतु करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीची जाणीव ठेवून कार्यकर्त्यांनी अंत्यविधीमध्ये सहभागी होण्यासाठी येऊ नये. निवडक दहा-पंधरा नातेवाइकांसह अंत्यविधी करीत आहोत. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या अटीचे पालन करण्याची जबाबदारी असल्याने अंत्यदर्शन सर्वांसाठी फेसबुक लाईव्हद्वारे उपलब्ध करून देत आहोत, असे पाटील परिवाराने कळवले होते.