‘लठ्ठे एज्युकेशन’ने सोळा किलो वजनाचे दप्तर घटवले

मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झालेला असताना सांगलीतील लठ्ठे एज्युकेशनच्या सर्व शाळांनी विविध प्रयोगांनंतर मुलांचे दप्तराचे वजन अवघ्या दीड किलोवर आणले आहे.

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
water shortage news
बंगळुरूमध्ये पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग करणाऱ्यांना लाखोंचा दंड!
Radish recipe
बटाट्याचे काप नेहमी खाता, एकदा मुळ्याचे काप खाऊन तर पाहा, नोट करा सोपी रेसिपी

प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन साधारण १६ ते १८ किलोएवढेच असल्याचे अनेक ठिकाणी आढळून आले आहे. या वाढीव वजनामुळे मुलांमध्ये मानेचे, पाठीचे आजार वाढू लागले आहेत. अनेक विषय, अवांतर विषय या साऱ्यांची वह्य़ा-पुस्तके तसेच अन्य गोष्टींची मागणी यामुळे मुलांचे हे दप्तर दिवसेंदिवस जड होत गेले होते.

गृहपाठ, वही, पुस्तके, पाण्याची बाटली, जेवणाचा डबा या साऱ्यांमुळे हे दप्तर एक ओझे बनले. यावरून सरकारी पातळीवरही चर्चा होऊन दप्तरांचे ओझे मुलांच्या वजनाच्या दहा टक्के असावे असे निर्देश देण्यात आले आहेत.

सांगलीतील लठ्ठे एज्युकेशन संस्थेनेही या दप्तराच्या ओझ्याचा अभ्यास केला. त्यावरून विषय, वेळापत्रक, तासिकांचा अभ्यास करत अनेक वह्य़ा-पुस्तकांना फाटा मिळू शकतो हा अंदाज घेतला गेला. यासाठी रोजच्या वेळापत्रकात एका विषयाचे दोन तास असे तीन विषयच अध्यापनासाठी ठेवण्यात आले. विषयासाठी रोज दोन प्रमाणे प्रत्येक विषयासाठी आवश्यक असलेली तासिका देण्यात आली.

मराठी, िहदी व इंग्रजी या भाषा विषयांसाठी एक, गणित, विज्ञानासाठी एक आणि सामाजिक शास्त्र विषयासाठी एकच वही निश्चित करण्यात आली. गृहपाठ शाळेतच घेण्याचे ठरविण्यात आले. याशिवाय मार्गदर्शक गाइड, स्वाध्याय याला पूर्णपणे फाटा देण्यात आला. एकाच बाकावरील विद्यार्थ्यांमध्ये विभागणी करून पुस्तकांची वाटणी करण्यात आली.

पाण्याच्या बाटलीचे प्रमाण केवळ २०० मिली करण्यात आले. यामुळे १६ किलो वजन असलेल्या दप्तराचे ओझे अवघ्या दीड किलोवर आले.

पहिलाच प्रयोग

राज्यातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले. प्रकल्पासाठी मुख्याध्यापक सुगंधा देवाण्णा, अध्यापक मीना वाझे, एम. एन. तांबोळी, एस. बी. चौगुले यांनी यासाठी कृती आराखडा तयार केला.

(((  कमी वजन असलेले दप्तर.     ))