22 November 2019

News Flash

पालघरमध्ये शाळेच्या बसला अपघात, 19 विद्यार्थी जखमी

बस चालकाची प्रकृतीही गंभीर आहे अशी माहिती मिळते आहे

प्रतिकात्मक छायाचित्र

पालघर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या बसला माहीमजवळच्या पाणेरी नदीजवळ अपघात झाला. या अपघातात 19 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. तर बस चालकाची प्रकृतीही गंभीर आहे अशी माहिती मिळाली आहे. सर जे.पी. इंटरनॅशनल स्कूल बसला हा अपघात झाला. चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले आणि त्यानंतर ही बस झाडावर आदळली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

जे. पी. इंटरनॅशनल स्कूलची बस विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात होती. त्याचवेळी हा अपघात घडला. या अपगाघातात चार विद्यार्थी गंभीर जखमी तर पंधरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर पालघरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात बसच्या काचेचा चक्काचूर झाला. काही महिन्यांपूर्वी याच शाळेची एक बस सहा ऐवजी पाच चाकांवर धावल्याचा प्रकार घडला होता. मात्र त्या घटनेकडे शाळेने दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केला होता. आता याच शाळेच्या बसला अपघात झाला आहे.

First Published on February 11, 2019 3:42 pm

Web Title: school bus accident in palghar 19 students injured
Just Now!
X