शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविणारा सदोष आदेश रद्द करावा, विनाअनुदानित शाळांना वेतन अनुदान, तसेच अनुदानित शाळांना वेतनेतर अनुदान द्यावे आदी मागण्यांसाठी राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनात जिल्ह्यातील १२० खासगी माध्यमिक शाळांनी सहभाग दिला.
जिल्ह्यात १५२ माध्यमिक, तर १४५ खासगी शाळा आहेत. यात १४८ शिक्षक, तर १८४ शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्याचा भाग म्हणून संघटनेने ‘शाळा बंद’ची हाक दिली होती. यात १४५पकी १२० शाळा बंद होत्या, तर खासगी प्राथमिक शाळा मात्र चालू होत्या, असा दावा शिक्षक विभागाने केला.
राज्य माध्यमिक शाळा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना व महात्मा फुले शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर विठ्ठल सोळंके, चंद्रकांत वाबळे, रामकिशन बोरकर, शिवाजी इंगोले, आर. व्ही. अग्रवाल, सुभाष सूर्यवंशी, संजय टाकळगव्हाणकर, सत्यप्रकाश नांदापूरकर आदींच्या सह्य़ा आहेत.
जिल्ह्य़ात १४८ अतिरिक्त शिक्षकांपकी एक वगळता बाकीचे, तर १८४ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपकी ५ कर्मचाऱ्यांचे समायोजन झाले. उर्वरित कर्मचाऱ्यांचे समायोजन होण्याची शक्यता कायद्यातील तरतुदीप्रमाणे अवघड असल्याचे पवार यांनी सांगितले.
खासगी शाळा, महाविद्यालयांच्या
‘बंद’ ला संमिश्र प्रतिसाद
वार्ताहर, उस्मानाबाद
खासगी शिक्षण संस्थांच्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थांपकी काही शिक्षण संस्थाचालकांनी शुक्रवारी शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ‘बंद’ ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
कायम शब्द वगळलेल्या व अनुदानित शाळांना पगाराची तरतूद करावी, अनुदानित शाळांची तपासणी त्रयस्त समितीकडून करू नये, ३ किलोमीटपर्यंत खासगी शाळेचा आठवीचा वर्ग असल्यास जि. प. शाळेस आठवीच्या वर्गाची परवानगी देऊ नये, पाचवी ते सातवी वर्गास माध्यमिक शाळा संहितेनुसार विद्यार्थीसंख्या २०, १५, १५ ची मान्य करून शिक्षक निश्चिती करावी, मूल्यांकन झालेल्या उच्च माध्यमिक शाळांना अनुदान द्यावे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे खासगी शाळेस माध्यमिक शाळा संहितेनुसार ४ सेवक असावेत, लिपीक, शिपाई भरतीवरील बंदी उठवावी या मागण्यांसाठी शुक्रवारी अचानक शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास शाळा बेमुदत बंद ठेवण्याबरोबरच दहावी, बारावी परीक्षा केंद्रावर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षण संस्थाचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला. जिल्हा खासगी शिक्षण संस्थाचालक संघाचे अध्यक्ष सुधीर पाटील, कृती समितीचे अध्यक्ष लहुराज लोमटे, चंद्रकांत हाजगुडे, पांडुरंग लाटे, कुंडलिक माने, डॉ. नरवडे, सुहास सरवदे, धनंजय िशगाडे, दत्ता बंडगर, विरेश डोंगरे आदींनी परिश्रम घेतले.