दिवाळीच्या सुट्टीत वाढ करण्याची विद्यार्थी आणि शिक्षकांची विनंती अखेर मान्य करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आता ७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत सुट्टी असल्याचं जाहीर केलं आहे. उद्यापासून (शनिवार) ऑनलाइन शिक्षणासाठी २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी देण्यात आली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्यापासून म्हणजेच ७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे.

 

Nashik, Chhagan Bhujbal, dada bhuse,
नाशिकच्या जागेवरून आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये वर्चस्वाची लढाई
Jalgaon district president of Ajit Pawar group sanjay pawar criticizes Eknath Khadses surrender to avoid imprisonment
एकनाथ खडसेंची शरणागती तुरुंगवारी टाळण्यासाठीच, अजित पवार गटाच्या जळगाव जिल्हाध्यक्षांची टीका
वीस वर्षे ‘ज्या’ व्यक्तीविरोधात संघर्ष केला तिलाच राष्ट्रवादीने आयात केलं, साहजिकच विलास लांडे नाराज होतील – अमोल कोल्हे
Ramdas Athawale
महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा

 

 

करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. त्यामुळे कित्येक महिने विद्यार्थी शाळेत गेलेले नाहीत. अशा परिस्थितीत यंदा दिवाळीची सुट्टी असणार का? असा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना पडला होता. वर्षा गायकवाड यांनी शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे हे जाहीर केलं. मात्र आधी पाचच दिवसांची सुट्टी दिल्याने अनेकजण हिरमुसले होते. आता मात्र ही सुट्टी २० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

करोना आणि लॉकडाउन या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत गुंतले होते. दरवर्षी दिवाळीची सुट्टी २१ दिवसांची असते. मात्र यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा उशिरा उघडल्याने दिवाळीची सुट्टी कमी करण्यात आली.

दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेणं शक्य नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. दहावी आणि बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय होणं बाकी आहे. त्याबाबत नियमावली आणि सूचनाही जाहीर झालेली नाही.