News Flash

पुण्यात शॉक लागून ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू

 स्थानिकांनी पृथ्वीराजला मंगेशकर रूग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सायकल चालवताना विजेच्या खांबाचा शॉक लागल्याने ६ वीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पृथ्वीराज विशाल चव्हाण असे या मुलाचे नाव आहे. तो रोजरी शाळेत ६ व्या इयतेत्त शिकत होते. त्याचे वडिल विशाल चव्हाण हे पोलीस पाटील होते. पुण्यातील वारजे माळवाडी येथे आरएमडी महाविद्यालयासमोर सायकल चालवताना या मुलाचा मृत्यू झाला. वारजे माळवडीतील ११ साई सोसायटीमध्ये तो राहात होता.

पृथ्वीराज हा ११ वर्षांचा मुलगा रोज सकाळी सायकल चालवत असे. आज सकाळी १०.३० च्या सुमारास मित्रासोबत आरएमडी महाविद्यालयासमोर असलेल्या सायकल ट्रॅकवर पृथ्वीराज सायकल चालवत होता. त्यावेळी त्याचा विजेच्या खांबाचा शॉक लागला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी पृथ्वीराजला मंगेशकर रूग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पुणे महानगरपालिकेच्या वतीने बसवण्यात आलेल्या नवीन विजेच्या खांबाजवळ ही घटना घडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 1:51 pm

Web Title: school student death due to electric shock in warje pune
Next Stories
1 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात, जखमी चालकाची अर्ध्या तासाने सुटका
2 पुणे रेल्वे स्थानकावर पहिले ‘प्लास्टिक बॉटल क्रश’ यंत्र कार्यान्वित
3 बेशिस्त वाहनचालकांना ९१ लाखांचा दंड
Just Now!
X