News Flash

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे पुण्यात ‘स्कूटर ढकल’ आंदोलन

केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार आल्यापासून जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्यात अपयशी ठरले आहे. दरवाढ मागे न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन केले जाईल

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंधनदरात होत असलेल्या वाढीच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसकडून 'स्कूटर ढकल' हे अभिनव आंदोलन करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून इंधनदरात सातत्याने होत असलेल्या वाढीच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसकडून ‘स्कूटर ढकल’ हे अभिनव आंदोलन करण्यात आले. या दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात सहभागी झालेले कार्यकर्ते हातात स्कूटर घेऊन ती ढकलत नेत सरकारविरोधी घोषणा देत होते.

यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार आल्यापासून जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्यात अपयशी ठरले आहे. त्यात प्रामुख्याने मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. याचा विचार हे सरकार करताना दिसत नसून केवळ हे सरकार केवळ उद्योगपतींचे आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच केंद्र सरकारने दरवाढ मागे न घेतल्यास काँग्रेसकडून आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही दिला.

या आंदोलनात माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, अविनाश बागवे, अभय छाजेड तसेच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 2:09 pm

Web Title: scooter dhakal rally against petroleum rates hikes from congress in pune
Next Stories
1 लोणावळ्यात भीषण अपघातात तीन वर्षीय मुलीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू
2 लहान प्राण्यांच्या दहनासाठी स्वतंत्र स्मशानभूमी
3 गदिमांचे स्मारक अजून का होत नाही?
Just Now!
X