इंडोनेशिया येथील करोनाबाधित व्यक्ती तालुक्यातील लोणीसह परिसरातील सात गावांत दहा दिवस वास्तव्य करून गेली त्यानंतर तबलीगी जमात मधील २५ जणांना तपासणी करिता ताब्यात घेतले आहे. यातील लोणी येथील एक व्यक्तीची चाचणी  पॉझिटिव्ह तर २४ जणांची निगेटिव्ह आली. मात्र लोणी येथील बाधित व्यक्तीच्या नातेवाइकांना व संपर्कात आलेल्या ४१ जणांना तपासणी करिता शनिवारी उशिरा ताब्यात घेऊन त्यांना नगर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर लोणी बुद्रुक व लोणी खुर्द या गावांत ३ दिवसांकरिता कडक टाळेबंदी लागू केली आहे.

इंडोनेशिया येथील करोनाबाधित व्यक्ती कोल्हार, भगवतीपूर, लोणी, हसनापूर, पाथरे, हणमंतगांव, दाढ आदी सात गावांतील तबलीगी मशिदीत सुमारे १० दिवस वास्तव्य करून गेली. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या तबलीग जमातीतील २५ जणांना तपासणीकरिता आरोग्य व पोलीस यंत्रणेने ताब्यात घेतले. त्यांना नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर यातील लोणी येथील एक व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळली. तर सुदैवाने कोल्हार व इतर गावांतील सर्व २४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.