09 August 2020

News Flash

गडचिरोली : कोरची, कुरखेडा तालुक्यातील १९ ग्रामसभांचे सील केलेले बँक खाते होणार सुरु

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

संग्रहीत छायाचित्र

रवींद्र जुनारकर

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर कोरची, कुरखेडा तालुक्यातील १९ ग्रामसभांचे बँकेने सील केलेले खाते तात्काळ सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना दिले आहेत.

कोरची व कुरखेडा तालुक्यातील १९ ग्रामसभांच्या बँक खात्यात मोबाईल टॉवरचे ७० ते ७५ लाख रूपये जमा झालेले आहेत. यातील काही पैसा खर्च झाला आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी या ग्रामसभांची पाच सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू केली. यातील दोन ग्रामपंचायतींमध्ये घोळ झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी तात्काळ पूर्ण करून सील केलेले बँक खाते तात्काळ सुरू करावे असे निर्देश यावेळी वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तेंदूपत्त्याचा हंगाम असल्यामुळे या संदर्भात तातडीने कारवाई करावी असेही सांगितले. काही ग्रामसभांचा घोळ आहे. ग्रामसेवकाला परस्पर काढून स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश केला गेला आहे. असे असले तरी ग्रामसभांना तेंदूपत्त्याचे काम करू द्यावे, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2020 9:41 pm

Web Title: sealed bank account of 19 gram sabhas in korchi kurkheda taluka will be started aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 सोलापुरात करोनाबळींची मालिका सुरूच; रूग्णसंख्या ५८३ वर, मृतांचा आकडा ५१वर
2 बुलडाण्यात पाच वर्षीय चिमुकलीची करोनावर मात; एक रुग्ण नव्याने आढळला
3 राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ५० हजारांच्या घरात; दिवसभरात आढळले ३ हजार रुग्ण
Just Now!
X