News Flash

नाशिक : कामगारांना घेऊन जाणारी दुसरी रेल्वे उत्तर प्रदेशकडं रवाना; प्रवाशांनी दिल्या ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा

नाशिक येथे अडकून पडलेल्या उत्तर प्रदेशातील कामगारांसाठी ही रेल्वे गाडी सोडण्यात आली.

नाशिक : उत्तर प्रदेशातील स्थलांतरीत कामगारांना सोडण्यासाठी नाशिक येथून दुसरी रेल्वे गाडी शनिवारी सोडण्यात आली.

नाशिक येथे अडकून पडलेल्या मध्य प्रदेशातील कामगारांना त्यांच्या रोज्यात सोडण्यासाठी काल विशेष रेल्वे गाडी सोडण्यात आली होती. त्यानंतर आज उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे जाण्यासाठी दुसरी रेल्वे गाडी रवाना झाली.

नाशिक येथे कामानिमित्त वास्तव्याला असलेल्या साडेआठशे नागरिकांना घेऊन ही गाडी निघाली आहे. जाताना गाडीत त्यांना खाण्यापिण्याचं साहित्यही पुरवण्यात आलं आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि जेवण तसेच बिस्किटं असे पदार्थ त्यांना प्रशासनाने सोबत दिले आहेत.

नाशिक रोडच्या रेल्वे स्थानकातून ही विशेष रेल्वे सुटल्यानंतर या उत्तर प्रदेशातील मंडळींनी ‘जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकार जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी केली. तसेच देश म्हणून आपण या संकटाचा मुकाबला करू शकू याबद्दल आत्मविश्वास आज आणखी वाढला अशी प्रतिक्रियाही एका प्रवाशानं दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 11:47 am

Web Title: second train to uttar pradesh leaves from nashik workers announce jai maharashtra aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 महिनाभरात मालेगावात विविध कारणांनी ७०० जणांचा मृत्यू
2 Coronavirus : धुळ्यात करोनाचे आणखी दोन रुग्ण
3 नाशिकमध्ये गारपिटीसह पाऊस; द्राक्ष, कांद्याचे नुकसान
Just Now!
X