08 August 2020

News Flash

तटकरेंचे कार्यालय सुरक्षा रक्षकांनीच लुटले

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील घरातील कार्यालयावर चोरटय़ांनी डल्ला मारला आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या घरातील चार सुरक्षा रक्षकांनीच हा डल्ला मारला.

| August 4, 2014 12:02 pm

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील घरातील कार्यालयावर चोरटय़ांनी डल्ला मारला आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या घरातील चार सुरक्षा रक्षकांनीच हा डल्ला मारला.  ते १ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि किमती दस्तऐवज घेऊन हे चौघे फरार झाले आहेत. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहे तालुक्यातील सुतारवाडी येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे खासगी कार्यालय आहे. रमेश खत्री, तिर्थरूप पोडेल, रामप्रसाद, कैलाश अशी आरोपींची नावे आहेत. या चौघांनी संगनमत करून कार्यालयातील एक सुटकेस, १ लाख ३५ हजार रोख रक्कम आणि तटकरे कुटुंबीयांचे महत्त्वाचे दस्तऐवज चोरून नेले. हा प्रकार ४ जून रोजी सकाळी नऊ वाजण्यापूर्वी घडला असल्याची फिर्याद नचिकेत श्रीधर गुणे रा. निजामपूर, ता. माणगाव यांनी रोहा पोलीस ठाण्यात केली आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या कार्यालयातील सुरक्षा रक्षक या पदावर काम करणारे चारही जण नेपाळ येथील रहिवासी होते. त्यांचे मूळ वास्तव्याचे पत्ते उपलब्ध नसल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच घटना घडल्याच्या जवळपास दोन महिन्यांनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2014 12:02 pm

Web Title: security guard robbed sunil tatkare office
टॅग Robbery
Next Stories
1 गुंगीचे औषध देऊन रेल्वे प्रवाशांना लुबाडले
2 माळीणमध्ये शोधकार्य आणखी चार दिवस
3 येवल्याजवळील अपघातात इंदूरचे सहा जण ठार
Just Now!
X