06 July 2020

News Flash

नांदेडात ६ लाखांचा गुटखा छाप्यात जप्त

जुना मोंढा परिसरातील दुकानात छापा टाकून सुमारे ६ लाख रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. विशेष बाब म्हणजे याच दुकानावर पूर्वी तीन वेळा छापा टाकून गुटखा जप्त

| March 21, 2014 01:15 am

जुना मोंढा परिसरातील दुकानात छापा टाकून सुमारे ६ लाख रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. विशेष बाब म्हणजे याच दुकानावर पूर्वी तीन वेळा छापा टाकून गुटखा जप्त करण्यात आला होता.
स्थानिक पोलिसांना हाताशी धरून शहरात जुना मोंढा परिसरातील दिनेश एजन्सीचा मालक गोपाल पुरुषोत्तम दाडिया अनेक दिवसांपासून अनधिकृतपणे गुटख्याची विक्री करीत होता. गुटखा बंदीनंतरही त्याचा धंदा सुरूच होता. या पूर्वी अन्न व औषध प्रशासनाने ३ वेळा छापे टाकून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला होता. तीनदा कारवाई झाल्याने गोपाळ दाडिया हा व्यवसाय बंद करील, असे वाटत होते. परंतु काही पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याचा उद्योग सुरूच राहिला.
दुकानात मोठय़ा प्रमाणात गुटखा आल्याची माहिती मिळाल्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या वेळी गोवा, सितार, बॉम्बे, दिलदार, नजर या कंपनीच्या गुटख्याचा मोठा साठा सापडला. पोलिसांनी हा सर्व गुटखा जप्त केला. दाडिया याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. शहर व परिसरात गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रमुख प्रवीण काळे यांनी अनेक ठिकाणी कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई केली. ही कारवाई सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2014 1:15 am

Web Title: seize gutkha in nanded
टॅग Gutkha,Nanded,Seize
Next Stories
1 महिलेस बेशुद्ध करून भरदिवसा दागिने लूटले
2 ‘सरकारतर्फे जाहीर मदत जखमेवर मीठ चोळणारी’!
3 ‘सरकारतर्फे जाहीर मदत जखमेवर मीठ चोळणारी’!
Just Now!
X