19 September 2020

News Flash

सव्वाचार लाख रुपयांचा गुटखा साता-यात जप्त

येथील अंजली कॉलनीतील संजय सदाशिव तवर याच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिका-यांनी धाड टाकून ४ लाख २७ हजार ६२० रुपयांचा गुटखा

| June 16, 2014 03:14 am

येथील अंजली कॉलनीतील संजय सदाशिव तवर याच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिका-यांनी धाड टाकून ४ लाख २७ हजार ६२० रुपयांचा गुटखा हस्तगत केला.
या बाबत अधिक माहिती देताना सहायक आयुक्त रामिलग बोडके यांनी सांगितले. या कारवाईत गोवा गुटखा १००० लाल, १००० हिरवा, राज कोल्हापुरी गुटखा, हिरा, आरएमडी, आरएमडी पान मसाला, एमची विंग टोबॉको असे सहा पोत्यांमधला गुटखा जप्त केला. या पूर्वीही तवर याच्या कडून पावणेदोन लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता. या कारवाईत इम्रान हवालदार, सुरेश दांगट, उदय लोहकरे, वंदना रूपनवर आणि शुभांगी अंकुश यांनी भाग घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 3:14 am

Web Title: seized gutkha of rs 4 lakh in satara 2
Next Stories
1 ऐषारामी जीवन जगणा-या चोरटय़ाला अटक
2 महिलेचा पेटवून खून, सासू व सास-यास अटक
3 महिलांवरील अत्याचाराच्या सोलापुरात तीन घटना
Just Now!
X