News Flash

रेशन दुकानात चक्क दारू विक्री सात लाखांचा माल जप्त

सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानात  स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला

वाई: चिमगणगाव ( ता. सातारा) येथे एका रेशन दुकानातच दारुची अवैध विक्री सुरू होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून संबंधितास ताब्यात घेतले असून सात लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.

चिमणगांव ( ता. कोरेगांव ) एक जण सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानात बेकायदेशीर दारूची चोरटी विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या ठिकाणी ग्राहक पाठवून खात्री झाल्याने  सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानात  स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला . दुकानामध्ये व दुकान मालकाच्या  जीपमध्ये  (एमएच ११ बीव्ही३५५३ ) मध्ये देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व इतर असा एकुण सात लाख आठ हजार ५७६ रुपयांचा  माल मिळून आला. संशयिताने जिल्हाधिकारी सातारा यांचे कोवीड-19 अनुषंगाने लागू असलेल्या आदेशाचा भंग केल्याने त्याच्या गुन्हा दाखल करुन कारवाई केली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहाय्यक फौजदार जोतीराम बर्गे, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे,शरद बेबले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, संकेत निकम यांनी केलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 11:56 pm

Web Title: seizure of liquor worth rs 7 lakh in ration shop akp 94
Next Stories
1 Oxygen shortage : …रूग्ण वाढ अधिक झाली तर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता – मुख्यमंत्री
2 एक रकमी १२ कोटी लशी विकत घ्यायची महाराष्ट्राची तयारी – उद्धव ठाकरे
3 रेमडेसिविरचा अनावश्यक वापर टाळा – मुख्यमंत्र्यांचं आवाहन
Just Now!
X