News Flash

सरळसेवा भरतीसाठी राज्य सरकारकडून चार कंपन्यांची निवड

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली माहिती

संग्रहीत

“महाराष्ट्र राज्याच्या विविध विभागातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब आणि गट क मधील रिक्त पदांच्या सरळसेवा पदभरती प्रक्रियेसाठी पूर्वीच्या सरकारने आणलेल्या ‘महापोर्टल’ प्रणालीमध्ये अनेक त्रुटी होत्या. याच सोबत विद्यार्थ्यांच्या असंख्य तक्रारी लक्षात घेत, महाविकासआघाडी सरकारने तात्काळ या प्रणालीला स्थगिती दिली होती. आता राज्य सरकारनं सरळसेवा भरतीसाठी चार कंपन्यांनची निवड केली आहे.” अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे .

या संदर्भात बोलताना सतेज पाटील यांनी सांगितले की, “महापरीक्षा पोर्टल अतंर्गत येणाऱ्या परीक्षा पद्धतीत बदल करुन सुधारित परीक्षा पद्धतीनुसार सर्व्हिस प्रोवायडरची निवड करण्याची प्रक्रिया आणि जबाबदारी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई (महा आयटी) यांच्याकडे देण्यात आली होती. त्या विभागानं निवड करुन सादर केलेल्या माहितीनुसार चार कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार अँपटेक लिमिटेड, जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्र. लि., जींजर वेब्ज प्रा. लि. व मेटा-आय टेक्नॉलॉजी प्रा. लि. या कंपन्यांना महाराष्ट्रातील आगामी पाच वर्षांतील मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, त्याच्या अधिपत्याखालील शासकीय विभाग, एमएपीएसीच्या कार्यकक्षेबाहेरील गट ब आणि गट क च्या परीक्षा पद्धती राबवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.”

तसेच, “दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या आपल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना सक्षम व पारदर्शक पदभरती प्रणाली उपलब्ध करण्यासाठी महाविकासआघाडी प्रयत्नशील आहे. परंतु, अचानक आलेल्या या करोनाच्या संकटामुळे या कामाला काही प्रमाणात वेळ लागत होता. पदभरतीसाठी सक्षम व पारदर्शक प्रणाली उभी करण्यासाठी राज्य सरकारकडून काढण्यात आलेली टेंडर प्रक्रिया ११ डिसेंबर, २०२० रोजी पूर्ण झाली असून, त्या संबंधित शासन निर्णय २२ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आला ” असे देखील सतेज पाटील म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 5:06 pm

Web Title: selection of four companies from the state government for direct service recruitment msr 87
Next Stories
1 या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल, तर शिवसेनाच हवी -संभाजी भिडे
2 फडणवीस-पाटील यांनी भाजपा प्रवेशासाठी दिली होती १०० कोटींची ऑफर; राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट
3 शिवसेनेची सत्ता उलथवण्यासाठी शक्य ते सर्व करु; राज ठाकरेंच्या भेटीनंतर लाड यांचं विधान
Just Now!
X