दिग्दर्शन, अभिनय, निर्मिती व्यवस्थापन अशा चित्रपट निर्मितीच्या तिन्ही क्षेत्रात ठसा उमटवणारे कोल्हापूरचे ज्येष्ठ अभिनेते बलदेव इंगवले यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते.
सुरूवातीपासूनच अभिनयाची आवड असल्याने १९४७ मध्यें राजा परांजपे दिग्दर्शित ‘बलिदान’ या चित्रपटात त्यांनी प्रथम काम केले. भालजी पेंढारकर, विश्राम बेडेकर, दिनकर द. पाटील, माधव शिदे, बाळ गजबर, वसंत पेंटर, अनंत माने यांच्यापासून सतीश रणदिवे ,भास्कर जाधव, प्रकाश काशीकर आदी नामवंत दिग्दर्शकांच्या हाताखाली त्यांनी अभिनयाचे रंग खुलवले. सुमारे २०० पेक्षा अधिक चित्रपटात त्यांनी तिन्ही विभागात काम केले. ‘सर्जा’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले होते. चरित्र अभिनेता अशी त्यांची विशेष ओळख राहिली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा २००५ साली मानाचा ‘चित्रकर्मी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते बलदेव यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2019 10:08 pm