News Flash

करोनामुळे सौर ऊर्जा प्रकल्पाचं स्वप्न राहिलं अधुरं; संसर्ग झाल्याने गुरुग्रामच्या अभियंत्याचा मृत्यू

सेवाग्राममधील रुग्णालयात सुरू होते उपचार

संग्रहित छायाचित्र

वर्धा : करोनाशी १७ दिवस झुंज दिल्यानंतर आज मृत्यू झालेल्या गुरूग्रामच्या जेष्ठ अभियंत्याचे सौर उर्जा प्रकल्प उभारणीचे स्वप्न अपुरेच राहले.
दत्तपूर येथील महारोगी सेवा समितीच्या कुष्ठधाम परिसरात सौर उर्जेवर आधारित प्रकल्प साकारणार होता. हा संपुर्ण प्रकल्प स्वखर्चाने तयार करून देण्याची जबाबदारी हरियाणातील गुरूग्रामच्या ६५ वर्षीय अभियंत्याने स्वीकारली होती. मुंबईत बेस्ट कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत या व्यक्तीने पत्नी व दोन मुलांसह २०१३ला गुरूग्रामला स्थलांतर केले. सामाजिक कार्यात त्यांची आवड होती. त्याच आवडीपोटी ते पत्नीसह ५ जूनला वर्धेत कारने आले होते. ११ जूनला त्यांची प्रकृती बिघडल्याने सेवाग्रामच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. १२ जूनला त्यांचा करोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर उपचार सुरू झाले. गत पंधरा दिवसापासून त्यांच्या प्रकृतीत चढउतार होते. त्यांच्या पत्नी व मुलाचा अहवाल मात्र नकारात्मक आला होता. दोन दिवसापासून त्यांनी औषधोपचाराला प्रतिसाद देणे कमी केले होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिक स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सौर प्रकल्पाचे स्वप्न अखेर अपुरेच राहले.

जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी तीन करोनाबाधित व्यक्ती आढळून आल्या. औरंगाबाद येथील बजाज कंपनीत काम करणारे दोन युवक वर्धेत आले होते. ते करोनाबाधित असल्याचे आज स्पष्ट झाले. यापैकी एक आर्वी तालूक्यातील असून दुसरा वर्धा शहरातील आहे. तसेच पुलगाव येथील ६२ वर्षीय पुरूष करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. एकूण दहा रूग्ण उपचारार्थ असून त्यापैकी नऊ जिल्ह्याबाहेरून आलेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 10:00 pm

Web Title: senior engineer dies after coronavirus infection in wardha bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मान्सून अपडेट : महाराष्ट्रात उद्या मुसळधार पावसाचा अंदाज
2 कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण? एका क्लिकवर पहा प्रत्येक जिल्ह्याची आकडेवारी
3 अकोल्यात ५० कैद्यांसह तब्बल ९० नवे रुग्ण, आणखी तिघांचा बळी
Just Now!
X