सोलापूर जिल्ह्यातील शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार भाई संपतराव मारूती तथा एस.एम. पाटील (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने व अल्प आजाराने पुण्यातील एका खासगी रूग्णालयात रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास निधन झाले. जिल्ह्यात शेकापच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर व कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक वर्षे चळवळ उभी केली होती. रयत शिक्षण संस्थेचे ते उपाध्यक्ष तर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तब्बल ४० वर्षे संचालक व जिल्हा परिषदेचेही ते काही वर्षे सदस्य होते.

१९५२ ते १९६२ पर्यंत माढा विधानसभा मतदारसंघ राखीव होता. त्यानंतर १९६७ साली हा मतदारसंघ खुला झाल्यानंतर शेकापतर्फे भाई एस.एम.पाटील हे प्रथमच विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर १९७२ व १९७८ सालीही त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. जलतज्ज्ञ अनिल पाटील यांचे ते वडील होत. त्यांचे पार्थिव सांयकाळी पुण्याहून वरवडे (ता. माढा) या त्यांच्या मूळगावी आणण्यात येणार आहे.

Senior Gandhian Dhirubhai Mehta passed away
ज्येष्ठ गांधीवादी धीरूभाई मेहता यांचे निधन; कस्तुरबा हेल्थ सोसायटी झाली पोरकी
Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
Sharad Pawar supporter Praveen Mane join mahayuti
शरद पवार यांचे कट्टर समर्थक महायुतीमध्ये सहभागी… झाले काय?
Sharad Pawar NCPs Kolhapur District Youth President Nitin Jambhale passed away
शरद पवार राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष, इचलकरंजीचे माजी नगरसेवक नितीन जांभळे यांचे निधन