News Flash

राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या कमलाताई मराठे यांचे निधन

स्वातंत्र्य लढय़ात मोठाभाऊ मराठे यांच्या बरोबरीने त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व नंदुरबारच्या राजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या कमलाताई मराठे (९२) यांचे निधन झाले. स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिलेल्या कमलाताईंनी १० वर्षांपेक्षा अधिक काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. स्वातंत्र्य लढय़ात मोठाभाऊ मराठे यांच्या बरोबरीने त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. पुत्र दिलीप मोरे? यांच्या अकाली निधनानंतर जिल्ह्य़ात विस्कटलेली राष्ट्रवादीची घडी कमलाताईंनी सावरली. वृद्धापकाळाने अनेक दिवसांपासून त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या. प्रकृती साथ देत नसल्याने त्या पातोंडा येथील घरीच राहत होत्या. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2015 4:23 am

Web Title: senior ncp leader of the kamalatai marathe died
Next Stories
1 लाच स्वीकारताना मंडळ अधिकाऱ्यास अटक
2 मुसळधार पावसात लाखो भाविकांचे स्नान
3 ‘सौभाग्यवती’साठी सारं काही!
Just Now!
X