22 September 2020

News Flash

पत्नीवर गोळीबार केल्यानंतर मंत्रालयातील सचिवाची राहत्या घरी आत्महत्या

पवार यांच्या पत्नीवर सोलापूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

(सांकेतिक छायाचित्र)

मंत्रालयात सचिवपदावर कार्यरत असलेले विजयकुमार भागवत पवार यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी पत्नीवर देखील गोळीबार केला असून या गोळीबारात त्यांची पत्नी जखमी झाली आहे. पवार यांच्या पत्नीवर सोलापूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मंगळवेढ्यातील मरवडे गावचे रहिवासी असलेले विजयकुमार भागवत पवार हे मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत होते. कौशल्य विकास विभागात ते कार्यरत होते. पवार हे मंगळवेढ्यातील घरी आले होते. विजयकुमार भागवत कुमार यांचा गुरुवारी रात्री पत्नीशी वाद झाला होता, असे समजते. शुक्रवारी पहाटे त्यांनी पत्नीवर दोन गोळ्या झाडल्या आणि यानंतर घरात गळफास घेत आत्महत्या केली. गोळीबारात त्यांची पत्नी जखमी झाली असून त्यांच्यावर सोलापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्या पत्नीची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

विजयकुमार भागवत पवार आणि त्यांच्या पत्नीमध्ये नेमका काय वाद होता, त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा पोलीस तपास करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 8:28 am

Web Title: senior officer in mantralaya shot wife later commits suicide in pandharpur
Next Stories
1 काँग्रेस उमेदवार बांदिवडेकर वादात ; ‘सनातन’शी संबंध असल्याची चर्चा
2 काँग्रेसची फरफट करण्यात राष्ट्रवादीची आघाडी
3 पालघरमध्ये माकपचा बविआला पाठिंबा
Just Now!
X