News Flash

ज्येष्ठ अभिनेते नंदू पोळ यांचे निधन

रंगभूमीवरचा हसरा चेहरा हरपला

मराठी रंगभूमीवरील हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचे ज्येष्ठ अभिनेते नंदू पोळ यांचे गुरुवारी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरचा हसरा चेहरा हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. नंदू पोळ यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
‘घाशीराम कोतवाल’ नाटकाच्या नांदीवर पदन्यास करणाऱ्या कलाकारांच्या रांगेतील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी वामनमूर्ती.. ‘सामना’मधील मास्तरांना सेवा देणारा वेटर.. ‘गाढवाचं लग्न’ चित्रपटातील राजा.. छोटय़ा पडद्यावरील ‘नाजुका’ मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेला ‘धम्र्या’.. अशा भूमिकांसह गणपती मंडळांच्या देखाव्यांमागचे शब्द-सूर ध्वनीमध्ये बांधण्यासाठी रात्र-रात्र जागविणारा तंत्रज्ञ.. ‘थिएटर अॅकॅडमी’चे एक संस्थापक-सदस्य, अशा पडद्यावरील आणि पडद्यामागील अष्टपैलू भूमिका नंदू पोळ यांनी साकारल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 10:56 am

Web Title: senior theater actor nandu pol passes away
Next Stories
1 बिथरलेल्या ‘अजित’चे बेशुद्ध करून स्थलांतरण
2 अलमट्टी भरले, उजनी कोरडेच
3 मुरुडला दुर्मीळ काटेरी केंड मासा सापडला
Just Now!
X