30 October 2020

News Flash

‘१ मे’ काळा दिवस म्हणून साजरा करू- श्रीहरी अणे

यापुढे आमच्यावर हल्ला झाला तर प्रतिकार करू, शांत बसणार नाही.

Shree aney : यासंदर्भाती मी बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही चर्चा केली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी आम्ही विदर्भाचा विकास करू शकलो नाही तर स्वत:हून विदर्भ स्वतंत्र करू, असे आश्वासन दिल्याचे सांगितले.

‘१ मे’ हा महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय विदर्भवाद्यांच्या बैठकीत झाल्याची माहिती श्रीहरी अणे यांनी दिली. ‘१ मे’ला सर्व विदर्भवादी संघटना मिळून स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकवणार असल्याचेही अणेंनी सांगितले. स्वतंत्र विदर्भाच्या भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर अणे पत्रकारांशी बोलत होते. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून यापुढे आमच्यावर हल्ला झाला तर प्रतिकार करू, शांत बसणार नाही, असा इशारा अणेंनी यावेळी दिला. मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरें यांच्यासोबत चर्चा करून त्यांना वेगळ्या विदर्भाचे महत्त्व पटवून द्यायला तयार आहे. यासंदर्भात मी बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही चर्चा केली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी आम्ही विदर्भाचा विकास करू शकलो नाही तर स्वत:हून विदर्भ स्वतंत्र करू, असे आश्वासन दिले होते, असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2016 2:39 pm

Web Title: separate vidarbha supporters will celebrate maharashtra day as a black day says shreehari aney
Next Stories
1 मी तोंड उघडलं तर पळता भुई थोडी होईल- पंकजा मुंडे
2 एचएमटी धान संशोधकाचा सहावीला धडा
3 सुप्पा, कौडगावकरांची जिद्दीने दुष्काळावर मात
Just Now!
X