06 August 2020

News Flash

कोल्हापुरात बेड अभावी करोना रुग्णाच्या दुर्दैवी मृत्यूचे गंभीर पडसाद, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तक्रार

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूर : बेड अभावी करोना रुग्णाच्या दुर्दैवी मृत्यूचे गंभीर पडसाद कोल्हापुरात उमटताना दिसत आहेत. याप्रकरणी राज्यमंत्री दर्जा असलेले शिवसेनेचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबतची तक्रार केली असून संबंधिताना योग्य आदेश देण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी उद्या सीपीआर रुग्णालयात आढावा बैठक घेतली जाणार आहे.

कोल्हापूर नजीक बाजारपेठ असलेल्या गांधीनगर मध्ये जवळपास ८० हुन अधिक रुग्ण सापडले. त्यातील एका गंभीर करोनाबाधित रुग्णाचे नातेवाईक काल रात्री रुग्णाला घेऊन सीपीआर रुग्णालयात घेवून आले पण बेड शिल्लक नसल्याचे कारण सांगून रुग्णाला दाखल करुन घेण्यास नकार दिला. नातेवाईकांनी प्रशासंनाकडे उपचार करण्यासाठी पिच्छा पुरवूनही नकारघंटा ऐकवली गेली. रुग्णाला घेऊन नातेवाईकांनी निराश मनाने गाव गाठले. पहाटेच्या उपचाराविनाच त्या रुग्णाचा मृत्यू झाला. याचे पडसाद कोल्हापुरात उमटत आहेत.

शासकीय रुग्णालयात मर्यादित क्षमता ओळखून राज्य शासनाने महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचे निर्देश खाजगी रुग्णालयांना दिले आहेत. असे असताना उपचारा अभावी बेड न मिळाल्याने करोना रुग्णाचा मृत्यू होणे हे दुर्दैवी आहे, अशी तक्रार माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी तातडीने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.

करोना रुग्णांवर उपचारास टाळाटाळ?

राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन खाजगी रुग्णालये करोना रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ तर करत नाहीत ना की यामध्ये काही गैरकारभार सुरु आहे? असा प्रश्न क्षीरसागर यांनी शुक्रवारी उपस्थित केला आहे. या सर्व माहितीचा आढावा घेण्यासाठी उद्या शनिवारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर सीपीआर रुग्णालयांस भेट देणार आहेत. या प्रसंगी डीन, सिव्हिल सर्जन, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्व्यक आदी अधिकारी यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 8:30 pm

Web Title: serious repercussions of the unfortunate death of a corona patient due to lack of beds in kolhapur scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 आसोलामेंढा धरणावरील पर्यटन विकासाच्या कामांना गती द्या : विजय वडेट्टीवार
2 सोलापुरकरांचा करोनामुक्तीचा नवा पॅटर्न; ‘या’ गोष्टींमुळे रुग्ण होत आहेत लवकर बरे
3 यवतमाळ: करोनाबधितांची संख्या ७०० पार
Just Now!
X