कोकणचा विकास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती अभ्यास करत असून,या समितीने कोकणात विकासाच्या दृष्टीने विज्ञान व तंत्रज्ञानाची मदत (सायन्स टेक्नॉलॉजी) घेऊन काही केंद्र उभी होऊ  शकतात. असा सल्ला दिला आहे. त्याचा अंतिम अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे ठेवला जाईल आणि त्यातून कोकणच्या विकासाची दिशा ठरवली जाणार असल्याची माहीती राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली.

शरद पवार हे गोव्यावरून कोल्हापूरला जात असतना काहि काळ आंबोलीतील वसंतदादा शुगर इन्स्टिटयमूटला भेट दिल्यानंतर संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी मंत्री प्रविण भोसले, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉन्टस, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, राष्ट्रवादी  जिल्हा व्यापारी संघाच्या चित्रा देसाई, हिदायततुल्ला खान उपस्थित होते.

कोकणात कृषी फलोत्पादन, मच्छीमारी, पर्यटन या माध्यमातून विकास साधताना आणखी कोकणाच्या विकासाला गती मिळाली पाहिजे अशी अपेक्षा ठेवून सायन्स टेक्नॉलॉजी माध्यमातून विकासाचे नियोजन केले जाईल असे ते म्हणाले.

पवार म्हणाले,भाजपचे नेते सुरक्षा व्यवस्थे वरून सरकार वर टिका करत आहेत पण भाजपच्या नेत्यांच्याच फक्त सुरक्षा काढल्या नाहीत तर सरकारमधील काही मंत्र्याच्या ही सुरक्षाही काढल्या आहेत.त्यामुळे भाजपच्या टिकेला अर्थ नाही.सुरक्षा कोणाला द्यायची आणि काढायची हे आम्ही ठरवत नाही. तर पोलीसांची एक समिती ठरवत असते त्याच्या अहवालानुसार सुरक्षा वाढवणे कमी केल्या गेल्या आहेत. राज्य सरकारच्या कायदा सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप चुकीचा आहे,पण केंद्र सरकारने भाजपच्या नेत्यांना सुरक्षा पुरवल्या असतील तर त्यांचे सरकार आहे असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले.

आपण फलोत्पादन योजना कोकणात दिली पण नंतर त्याचे काहिच झाले नाही.पण आता कोकणाच्या बाबतीत केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाची शाखा पुणे येथील विद्यपीठात आहे या मध्ये काही तंज्ञ काम करतात त्या तज्ज्ञांच्या माध्यमातून कोकण विकासाचा अभ्यास केला जाईल. ही समिती येथील पारंपरिक व्यवसाया व्यतिरिक्त अन्य काहि विकासाच्या प्रयोग करता येतील का याचा अभ्यास करून आपला अंतिम अहवाल राज्य सरकार कडे देतील त्या अहवालानुसार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यानंतर कोकण विकासाला दिशा दिली जाईल. असे पवार यांनी सागितले.

काही तज्ञांची अभ्यास समिती नेमण्यात आली असून ही अभ्यास समिती येथील पारंपारिक विकासापेक्षा वेगळं काहीतरी कोकणात आणण्यासाठी अभ्यास करेल त्यानंतर याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांची तसेच इतर मंत्रही चर्चा करून त्याला मूर्त स्वरूप देऊ असे ते म्हणाले.

पर्यावरणीय बदल याच्या बाबतीत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले बंगालच्या उपसागरात मध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पर्यावरणात बदल झाले आहेत ते तसेच राहतील असे नाही .

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्या विरोधामध्ये दिल्लीत सलग ५४ दिवस उपोषण सुरू आहे आता केंद्र सरकारने कृषी कायदे स्थगित ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे.  त्यावर शरद पवार म्हणाले, शेतकरी उपोषण वर्षभर होईल .अशा इराद्यने तेथे आले आहेत. त्यांची कायदे स्थगित नको तर रद्द व्हावेत अशी मागणी आहे.

सरकारने त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करायला हवी, असे श्री.पवार म्हणाले.

हुतात्मा चौक मुंबई येथे येत्या दि.२३ ते २५ रोजी प्रतीकात्मक आंदोलन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मी उपस्थित राहावे असे शेतकरी संघटना वाटते आहे आपण तेथे जाऊ . असे देखील शरद पवार म्हणाले.

कोकणात कृषी फलोत्पादन अभियानातून मुख्यमंत्री असताना आणली ती यशस्वीपणे राबविली पण प्रकिया उद्य्ोग नाहीत याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, कोकणातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे.

राणेंना धोका की राणेंपासून धोका

भाजपच्या काही नेत्याची सुरक्षा काढल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या जीवाचे बरे वाईट झाल्यास सरकार जबाबदार राहिल असे म्हटले होते.पण यावर पवार यांनी राणेंपासून धोका का ?असे म्हणत मिश्कील टिपण्णी केली तसेच पोलीस ठरवतील त्यांना सुरक्षा द्यायची कीनाही अशी ही पुष्टी जोडली.