News Flash

सोलापुरात एकाच दिवसात सात करोनाबाधितांचा मृत्यू

दिवसभरात 25 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

प्रतिकात्मक छायाचित्र

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचा प्रादुर्भाव देशभरासह  दिवसेंदिवस राज्यातही झपाट्याने वाढत आहे. मुंबई व पुणे या प्र्मुख शहरांच्या पाठोपाठ अन्य शहारातील रुग्ण संख्या देखील वाढत वाढत आहे. सोलापुरात आज दिवसभरात करोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला तर 25 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 58 झाली आहे. तर एकूण करोनाबाधितांची संख्या 608 वर पोहचली आहे.

राज्यात आज तब्बल 2 हजार 436 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 60 जणांचा करोनाने बळी घेतला आहे. 1 हजार 186 जणांना आज रुग्णालायतून घरी पाठवण्यात आले आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 52 हजार 667 वर पोहचली आहे. यामध्ये करोनामुळे मृत्यू झालेले 1 हजार 695 जण व आतापर्यंत रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेल्या 15 हजार 786 जणांचा समावेश आहे.

याचबरोबर चोवीस तासांत देशभरात 6 हजार 977 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 154 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. यामुळे देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 38 हजार 845 वर पोहचली आहे.

देशभरातील तब्बल 1 लाख 38 हजार 845 करोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले 77 हजार 103 जण, उपाचारानंतर रुग्णालायतून सुट्टी देण्यात आलेले 57 हजार 720 व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 4 हजार 021 जणांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 9:41 pm

Web Title: seven corona patients die in a single day in solapur msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्रात २४३६ नवे करोना रुग्ण, ६० मृत्यू, संख्येने ओलांडला ५२ हजारांचा टप्पा
2 कोल्हापूर : ६८ नव्या करोनाबाधितांची नोंद, एकूण संख्या ४०९ वर
3 चंद्रपूर जिल्ह्यातील ५० वाघांचे स्थलांतरण करणार : वनमंत्री संजय राठोड
Just Now!
X