13 July 2020

News Flash

माथेफिरू तरूणाच्या हल्लय़ात सातजण जखमी

लांजा तालुक्यातील देवधे गुरववाडी येथे एका माथेफिरू तरुणाने लागोपाठ सातजणांवर कोयतीने वार केल्यामुळे एकच खळबळ माजली. 

लांजा तालुक्यातील देवधे गुरववाडी येथे एका माथेफिरू तरुणाने लागोपाठ सातजणांवर कोयतीने वार केल्यामुळे एकच खळबळ माजली.  बुधवारी  दुपारी साडेबारा ते पाऊ णच्या सुमारास घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर  प्रमोद गुरव हा हल्लेखोर स्वत:हून लांजा पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.  दरम्यान,   हल्लय़ातील सर्व जखमींना लांजा रुग्णालयातून रत्नगिरीतील शासकीय रुग्णालयात हलवण्यातआले आहे

याबाबत अधिक माहिती अशी — बुधवारी दुपारी प्रमोद सर्वप्रथम वाडीतील अक्षता आशिष गुरव (वय २० वर्षे) यांच्या घरात घुसला. तेथे त्यांच्यासह आयुष  या त्यांच्या पाच वर्षे वयाच्या लहानग्यावरही त्याने कोयतीने वार केले. हा प्रकार कळताच वाडीत गोंधळ उडाला. या गोंधळात त्याने आणखी चार महिला आणि एका प्रौढ पुरूषावर वार केले. यकापैकी काही  मानेवर वार झाल्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. या पाच जखमींची नावे पुढीलप्रमाणे— अस्मिता संदीप गुरव (वय ३४ वर्षे ), भास्कर दत्तात्रय पाटकर (५३), वैशाली अशोक गुरव (५२), सुलोचना मारुती गुरव (६१) आणि शिवांगी भास्कर पाटकर (५२ वर्षे) . यापैकी आयुष आणि सुलोचना गुरव यांची प्रकृती गंभीर आहे.

घटनेने लांजा तालुक्यात खळबळ

दरम्यान, या घटनेनंतर प्रमोद स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला.  तेथे तो जणू काहीच घडले नाही, अशा आविर्भावात वावरत होता. प्रमोद हा गुन्हेगारी पाश्र्वभूमीचा असून यापूर्वी मारामारीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचेही समजते. तसेच तो व्यसनीही असल्याचे घटनास्थळी बोलले जात होते. या प्रवृत्तीमुळे त्याचा गावात कोणाशी फारसा संपर्क नव्हता.  प्रमोदने हे कृत्य का केले, हे अद्याप उघड झालेले नाही. मात्र या घटनेने लांज्यात खळबळ उडाली असून  पोलिस या कृत्यामागील कारणांचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2019 1:38 am

Web Title: seven injured in mathefiru youth attack akp 94
Next Stories
1 रायगड जिल्ह्य़ात शेकापची वाटचाल खडतरच
2 सोयाबीनची आवक घटली
3 अकोला, वाशीम जिल्हा परिषदेत नव्या आघाडीचा प्रयोग?
Just Now!
X