सातारा जिल्ह्यात सलग तीन दिवस होत असलेल्या पावसाने मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेले आहे. उत्तर कोरेगाव तालुक्यातील चौधरवाडी येथे अंगावर वीज पडून सात जण जखमी झाले आहेत.
गेली तीन दिवस जिल्ह्यात तपमानाचा पारा ४० अंशांवर जात असून संध्याकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. सुमारे पाऊणतास पाऊस पडत असल्याने हवेत गारठा निर्माण होत असला, तरी दिवसभर तलखी होत आहे. सातारा, वाई, कराड, महाबळेश्वर या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडल्या. या पावसामुळे किती नुकसान झाले याचा अहवाल लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती कृषी विभागाचे अधिकारी प्रताप कदम यांनी दिली. दरम्यान, सातारा येथे सातारा-कोरेगाव रस्त्यावर करंजाचे मोठे झाड कोसळल्याने काल मध्यरात्रीपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. सातारा तसेच िलब गोवे, वरंगळ, मालगाव, शिवथर, कोंडवली, रायगाव, सायगाव या परिसरात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी विजेच्या तारांवर फांद्या पडून वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, चौधरवाडी ता. कोरेगाव येथे पावसापासून बचाव करण्यासाठी आंब्याच्या झाडाखाली थांबलेले लता िशदे, गौरी िशदे, राहुल िशदे, संगीता िशदे, नीलम िशदे, जयश्री िशदे व राजश्री जाधव यांना वीजेचा धक्का बसून राजश्री व राहुल हे गंभीर जखमी झाले तर उर्वरित ५ जण जखमी झाले आहेत. शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तसेच मल्हारपेठे येथील नारळवाडी येथे झालेल्या वादळामुळे ९ घरांचे साडेतीन लाखांचे नुकसान झाले असून व दुकान, घरावरील पत्रेही उडून गेले आहेत.
 त्यातच भर म्हणजे जिल्ह्यात असलेल्या १५ धरणांच्या खालावत जाणार्या पाण्याच्या पातळीची चिंता. दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जाणारा खटाव, माण भागात तीव्र स्वरूपात पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर कास, यवतेश्वर येथेही घटती पाण्याची पातळी हा चिंतेचा विषय ठरला आहे. तर दुसरीकडे वाई, पाचगणी, महाबळेश्वर ही थंड हवेची ठिकाणे सुट्टय़ा व असह्य उन्हाळ्यामुळे विश्रांती घेण्यास आलेल्या पर्यटकांनी फुलून गेला आहे. मात्र निसर्गाच्या या खेळामध्ये कधी काय होईल ते सांगता येत नाही मात्र पावसाने जिल्हाभरात लोकांची त्रेधा तिरपीट उडवली. मात्र, सकाळपासूनच चढत्या तापमानाने कंटाळलेले नागरिकांनी या पावसाचे स्वागत करुन मनमुराद पावसात भिजण्याचा आनंद लुटला. वळिवाच्या  पावसाचे स्नान हे आरोग्यदृष्टय़ा उत्तम असल्याचे सांगितले जाते. त्यातच सुट्टीचा आनंद घेत असलेल्या बालचमूला दुहेरी आनंदाचा फायदा झाला.
सांगलीत पावसाची पुन्हा दमदार हजेरी
सांगली-मिरजेसह विटा, तासगाव परिसरात बुधवारी दुपारनंतर दमदार वळिवाने हजेरी लावली. विटा परिसरात सुमारे अर्धा तास गारपिटीसह पावसाने झोडपून काढले. वादळाने झाडे पडल्याने विटा-मायणी रस्त्यावरील वाहतूक सायंकाळपर्यंत ठप्प झाली होती.
सांगली-मिरज परिसरात सायंकाळी ४ नंतर पूर्वेकडून आलेल्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. विटा शहरासह गार्डी, माहुली, नागेवाडी, घानवड या परिसरात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जोरदार गारपीटीसह जोरदार पाऊस झाला. वादळामुळे विटा-माहुली रस्त्यावर तीन ठिकाणी झाडे आडवी पडल्याने या मार्गावरील रस्ता वाहतूक बुधवारी ३ वाजल्यापासून ठप्प झाली होती.
तासगाव शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असला, तरी तालुक्याच्या गव्हाण, सावळज, बोरगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण, अलकुड, देिशग-खरिशग, हरोली परिसरात जोमदार पाऊस झाला. मिरज तालुक्यातील आरग, बेडग, एरंडोली परिसरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे तपमानात कमालीची घट झाली असून सुसह्य वातावरण निर्माण झाले आहे.