13 August 2020

News Flash

साताऱ्यात आणखी ८ जणांचे नमुने तपासणीसाठी

नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.

संग्रहित छायाचित्र

सातारा जिल्ह्यतील एका साठ वर्षीय महिलेचा दोन दिवसांपूर्वी कोविड—१९ आजाराचा संसर्ग झालेल्या महिलेशी निकटचा संपर्क आला असल्याने व तिला कोरडा खोकल्याचा त्रास होत असल्याने, आज सकाळी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

साठ वर्षीय महिलेच्या सात निकट सहवासितांचे नमुने तपासणीसाठी घेतले असून ते तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.अबुधाबी येथून दोन पुरुषांचा व कॅलिफोर्निया येथून प्रवास करून आलेल्या महिलेला संसर्ग नसल्याचा अनुमानितचा अहवाल आला आहे. अबुधाबी येथून प्रवास करून आलेला २८ वर्षीय युवक व ३९ वर्षीय पुरुष आणि कॅलिफोर्निया येथून आलेली ५१ वर्षीय महिला असे एकूण तिघांना बुधवार ( दि. २५) अनुमानित म्हणून शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्यांच्या घशातील स्रावांचे नमुने पुणे येथे एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात आले होते. त्यांना बाधा नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 12:56 am

Web Title: seven more samples checked for satara abn 97
Next Stories
1 शेतमालाच्या लिलावात पुरवठय़ातील अडचणींचा अडसर
2 करोना तपासणीचा अवघड प्रवास
3 कोकणातील पर्यटन व्यवसाय संकटात
Just Now!
X