News Flash

राज्यातील सात मुले चीनमध्ये अडकली

हे सर्व विद्यार्थी सुरक्षित असले तरी त्यांना घराबाहेर पडू नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

चंद्रपूर : चीनमध्ये थैमान घालणाऱ्या ‘करोना’ आजाराचा फटका तेथील नागरिकांसह तेथे शिक्षण घेणाऱ्या देशातील २७ विद्यार्थ्यांनाही बसला असून त्यात महाराष्ट्रातील ७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.  हे सर्व विद्यार्थी सुरक्षित असले तरी त्यांना घराबाहेर पडू नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या मुलांमध्ये विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्हय़ातील अनुक्रमे  भाग्यश्री उके, सोनाली भोयर  व प्राची भालेराव या तिघींचा समावेश आहे. चीनमधील हुआन शहरापासून  ९० किलोमीटर अंतरावर सियानिग गावात हुबई विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ असून तेथे भारतातील २७ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. यात महाराष्ट्रातील पुणे, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर , नांदेडच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गडचिरोलीचे निवृत्त तहसीलदार दयाराम भोयर यांची कन्या सोनाली, भद्रावती (चंद्रपूर) येथील दारुगोळा कारखान्यातील कर्मचारी विजय उके आणि प्राची भालेराव (यवतमाळ) या तिघींचा समावेश आहे.

चीनमधील विषाणूने तेथील ‘सियानिग’ हे शहर सुटले नाही. त्यामुळे विद्यापीठाने २७ भारतीय विद्यार्थ्यांना  घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. हे सर्व जण सुरक्षित आहे. पण त्यांच्याकडील खाद्यपदार्थ संपायला आले आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. चीनमधील भारतीय दुतावासाच्या माध्यमातून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

विद्यार्थ्यांची नावे..

चीनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये सलोनी त्रिभुवन (पुणे), जयदीप देवकाते (पिंपरी चिंचवड), आशीष गुरमे (लातूर), प्राची भालेराव (यवतमाळ), भाग्यश्री उके (भद्रावती), सोनाली भोयर (गडचिरोली) आणि कोमल जल्देवार (नांदेड) यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 3:31 am

Web Title: seven students from the maharashtra state stuck in china zws 70
Next Stories
1 आदिवासी प्रकल्प विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी ६ गुन्हे दाखल
2 छतावरून पडून युवती ठार
3 विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तीन जणांवर गुन्हा 
Just Now!
X