20 October 2020

News Flash

मनपा, नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार

कर्मचाऱ्यांकडून सातव्या वेतन आयोगाची मागणी जोर धरत होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

2 सप्टेंबरपासून महानगरपालिका तसेच नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा 7 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांनाही होणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांकडून सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी जोर धरत होती. मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2 सप्टेंबरपासून महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याला मान्यता देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 2:32 pm

Web Title: seventh pay commission for nagarpalika and mahanagarpalika employee from september cm devendra fadnavis
Next Stories
1 महाराष्ट्रातील नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना आरक्षण लागू करावे का?, नोंदवा तुमचे मत
2 राज ठाकरे काकांकडून काय शिकायला मिळालं ? आदित्य ठाकरेंचं सूचक उत्तर
3 नागपुरात औषध व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या
Just Now!
X