14 August 2020

News Flash

चंद्रपूर : पाथरी येथे अडीच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

आरोपीला अटक, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

संग्रहित छायाचित्र

चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली तालुक्यातील पाथरी येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. घराशेजारी राहणाऱ्या एका ४५ वर्षीय नराधमाने अवघ्या अडीच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अडीच वर्षांची चिमुकली बाहेर खेळायला गेली असताना आरोपी जितेंद्र रामदास मेश्राम (वय ४५) याने खाऊ देण्याच्या बहाण्याने तिला घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ती रडत असल्याने तिच्या आईने चौकशी केली असता तिला शंका आल्याने तिने मुलीला ग्रामीण रुग्णालय सावली येथे नेले आणि तिची वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय तपासणीनंतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या अभिप्रायावरून तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर मुलीच्या आईने पाथरीच्या पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन आरोपी जितेंद्र मेश्राम याच्याविरोधात तक्रार दिली. त्यानंतर त्याच्यावर कलम ३७६, अ, ब सह कलम ४, ६, १० पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, पाथरी पोलिसांनी दोन पथक तयार करून आरोपीचा शोध घेऊन अटक केली आणि गुन्हाही नोंद केला. या घटनेची माहिती होताच संपूर्ण गावात तीव्र पडसाद उमटले लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधामास कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सर्व पाथरीवासीय नागरिक करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 6:34 pm

Web Title: sexual abuse on two and a half year old girl at pathri chandrapur aau 85
Next Stories
1 ‘अमित शाह यांना भेटायला गेलेल्या फडणवीसांना महाराष्ट्रात कटोरा घेऊन फिरावं लागेल’
2 गडचिरोलीत एसआरपीएफच्या ७२ जवानांना करोनाची लागण
3 कोट्यवधींचा शासकीय लाभ घेऊनही रुग्णालयांचा करोनावरील उपचारास नकार
Just Now!
X