23 January 2018

News Flash

एस. ओ. एस. बालग्राममध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छळ

अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे असलेल्या एस. ओ. एस. बालग्राममध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांने अल्पवयीन विद्याíथनीचा लैंगिक छळ केला.

प्रतिनिधी, अलिबाग | Updated: April 5, 2015 3:01 AM

अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे असलेल्या एस. ओ. एस. बालग्राममध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांने अल्पवयीन विद्याíथनीचा लैंगिक छळ केला. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे एस. ओ. एस. बालग्राम आहे. पालक नसलेल्या मुलांना  या संस्थेत प्रवेश दिला जातो. संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर मुले संस्थेच्या घरांमध्ये राहतात. मार्च महिन्यात या संस्थेत राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यांने बालग्राममध्येच राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्याíथनीचा लैंगिक छळ केला. संस्थाचालकांनी याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
याचा अहवाल निरंक आला. परंतु संस्थाचालकांनी गुन्हा नोंदविण्याचे पत्र दिल्यामुळे अल्पवयीन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on April 5, 2015 3:01 am

Web Title: sexual assault of girl students in sos balgram confirmed
  1. No Comments.