News Flash

राष्ट्रवादीचा आणखी आमदार शिवसेनेत, पांडुरंग बरोरा शिवबंधनात अडकले

राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पांडुरंग बरोरा शिवबंधनात अडकले. यावेळी आदित्य ठाकरे यांचीही उपस्थिती होती.

बरोरा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूरचे आमदार असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. पांडुरंग बरोरा यांचे वडिल महादू बरोरा हेदेखील शहापुरमधून चार वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपासून बरोरा राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. अखेर त्यांनी राष्ट्रवादीा रामराम ठोकत शिवसेनेत प्ण्यारवेश केला आहे. बरोरा यांचा शिवसेनेतील प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

यापूर्वी बरोरा यांच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक मेसेजेस व्हायरल झाले होते. तसेच ‘आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर राष्ट्रवादीच्या पांडुरंगाच्या हातात भगवी पताका’ अशा आशयाचाही मेसेज व्हायरल झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 1:37 pm

Web Title: shahapurs ncp mla pandurang barora enters shivsena nck 90
Next Stories
1 एका कोंबडीच्या पिसाच्या आधारे उलगडलं हत्येचं कोडं, ठाणे पोलिसांची जबरदस्त कामगिरी
2 डॉ. विखेंनी केवळ निवडणुकीपुरता वापर केला; मराठी अभिनेत्रीचा आरोप
3 तिवरे धरणग्रस्तांचे माळीणप्रमाणे पुनर्वसन करा; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Just Now!
X