28 February 2020

News Flash

शैलेश रायपुरेची अनोखी गणेशभक्ती..

गणपतीचे विविध रूपी चित्रे रेखाटण्याचा विक्रमच शैलेश रायपुरे याने पुण्यात केला आहे.

चित्र रेखाटतांना शैलेश रायपुरे व गणपतीचे रेखाटलेले चित्र.

५९ दिवसात १० हजार चित्रांचे रेखाटन

ज्या पद्धतीने गणरायाच्या विविध रूपांचे आपल्याला दर्शन घडते, त्याच पद्धतीने श्रीगणेशाच्या भक्तांमध्येही विविध स्वरूपाच्या कला दिसून येतात. अशाच प्रकारची अनोखी कला शैलेश रायपुरे या युवकाच्या पेन्सिलीतून कागदावर उमटत आहे. शैलेशने गणरायाच्या भक्तीचा चित्ररूपी अविष्कार साकारला असून, ५९ दिवसात तब्बल १० हडारांवर श्रीगणेशांचे चित्र रेखाटले आहेत. गणरायाचे चित्र रेखाटण्याचा आगळावेगळा छंद शैलेशने लहानपणापासून जोपासला आहे.

गणपती म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत! त्यामुळे गणेशभक्त वेगवेगळ्या कला जोपासत असल्याचे दिसून येते. मूळचा अमरावती व सध्या पुण्यात स्थायिक असलेल्या शैलेश रायपुरे या युवकाने श्रीगणेशाचे विविधरूपी चित्रे रेखाटली आहेत. या अक्षरगणेश कलाकाराने ५९ दिवसांत तब्बल १० हजार विविध चित्रे रेखाटून बाप्पांच्या भक्तीचा अनोखा कलाविष्कार साकारला आहे. लहानपणापासून त्याला चित्र रेखाटनाची आवड आहे. शालेय जीवनातही हा छंद जोपासला. चित्र काढण्याची आवड लक्षात घेऊन शिक्षणही त्यातच पूर्ण केले. त्यानंतर गणरायाचे विक्रमी संख्येत चित्र काढण्याचा निर्धार शैलेशने केला. त्यानुसर चित्र काढण्याची सुरुवात २५ मार्च २०१६ पासून केली. १० मे २०१६ पर्यंत ५ हजार १९० विविध प्रकारचे गणरायाचे चित्र रेखाटून पूर्ण केले. हे कार्य ४५ दिवसांत पूर्ण झाल्यानंतर पुन्हा १८ मे २०१६ पासून चित्र काढण्यास सुरुवात केली. ३१ मे २०१६ च्या सकाळी ११.२० मिनिटांपर्यंत ४ हजार ८१० गणपतीचे चित्र रेखाटण्यात आले. केवळ १४ दिवसात साडेचार हजारावर चित्र रेखाटले. एकूण ५९ दिवसांत १० हजारांवर म्हणजचे दिवसाला सरासरी १६९ पेक्षा जास्त गणपतीचे चित्र काढले आहेत.

गणपतीचे विविध रूपी चित्रे रेखाटण्याचा विक्रमच शैलेश रायपुरे याने पुण्यात केला आहे. यासाठी त्याने कॅलिग्राफी पेन, ब्रश, पेन्सिल आणि पेनचा वापर केला. कोणत्याही नावात श्रीगणेश साकारण्याची कला शैलेशने आत्मसात केली. कोणत्याही नावात त्याला गणपतीची नानाविध अक्षररूपे दिसतात. गणपती ही देवता ओंकार स्वरूपातील आहे, त्यामुळे ती कुठल्याही स्वरूपात, कुठल्याही आकारात बघायला मिळते. शैलेशने गणपती बाप्पांच्या विविध नावांतून अक्षररूपी गणेश रेखाटण्यास सुरुवात केली. याच माध्यमातून गणपती साकारताना प्रत्येक नावात एक तरी गणेशरूप असतेच, याचा त्याला प्रत्यय आला आणि त्यातून कुठल्याही नावात त्याला गणपती दिसू लागला, त्यामुळे आजपर्यंत शेकडो नावांमधून त्याने गणरायाचे चित्र साकारले आहेत.

शैलेश रायपुरेने चित्रकलेची आपली आवड जोपासत अ‍ॅनिमेशनमध्ये उच्चशिक्षण पूर्ण केले. त्यामुळे विविध प्रकारच्या नामांकित कंपन्यांमध्ये थ्रीडी मॉडलिंग, सर्फेसिंग आर्टिस्ट, अनेक चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड आर्टिस्ट, यासह विविध जाहिराती व मालिकांमध्ये काम केले आहे. चित्रकलेसोबतच शैलेशला खेळाचीही आवड आहे. त्यामुळे ज्युदो खेळात राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पदके मिळवली आहेत.

First Published on June 7, 2016 2:30 am

Web Title: shailesh raipure draw ten thousand ganpati drawing in 59 days
Next Stories
1 विदर्भाच्या काशीतील शिवमंदिरामधील प्राचीन वास्तुशिल्पकला मोडकळीस
2 सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जनतेला शासनाच्या अटींचा खुलासा व्हावा
3 पोलिस आणि शत्रूंच्या हालचालींवरील निगराणीसाठी नक्षल्यांचा आता बालक संघ
Just Now!
X