गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर साताऱ्यात काही अज्ञात युवकांकडून पाळत ठेवण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडून देसाई सातारा शहरातून फेरफटका मारत हाेते. पायी चालत असलेल्या मंत्री देसाईंचे दोन युवक चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करीत हाेते. हे दाेघे एका दुचाकीवर हाेते. ही बाब मंत्री देसाईंच्या अंगरक्षकाच्या निदर्शनास आली. त्यावेळी त्याने युवकांना हटकले. परिणामी युवकांनी तेथून पळ काढला. या प्रकाराची माहिती मंत्री देसाई यांनी पाेलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना दिली.

पाेलिसांचा तपास सुरु

गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई हे आपल्या निवासस्थानी आहेत. ते सुरक्षित आहे. त्यांच्या विषयी कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. पाेलिसांचा तपास सुरु आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी माध्यमांना दिली. राज्याचे ग्रामीणचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडून शहरातून फेरफटका मारत हाेते. पायी चालत असलेल्या मंत्री देसाईंचे दोन युवक चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करीत हाेते. हे दाेघे एका दुचाकीवर हाेते. ही बाब मंत्री देसाईंच्या अंगरक्षकाच्या निदर्शनास आली. त्यावेळी त्याने युवकांना हटकले. परिणामी युवकांनी तेथून पळ काढला. काही वेळानंतर पुन्हा युवक मंत्री देसाईंवर पाळत ठेवण्यासाठी आले आणि पाेलिसांना पाहताच दुचाकी वेगात नेली.

या प्रकाराची माहिती मंत्री देसाई यांनी पाेलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. ज्या भागात मंत्री देसाई फेरफटका मारत हाेते. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. संबंधित युवकांचा शोध सुरू केला.
सातारा पाेलिसंकडून गृहराज्यमंत्री देसाई हे घरी सुरक्षित आहेत. काळजीचे कारण नसल्याचे पत्रक प्रसिद्ध केले. याबराेबरच पाेलीस या प्रकाराचा कसून तपास करीत असल्याचे म्हटले आहे.