शनिशिगणापूर येथील शनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याची मुभा महिलांना मिळाली नसली तरी आंदोलनामुळे पुरुषांनाही आता चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास परवानगी दिली जात नाही. केवळ पुजाऱ्यालाच हा अधिकार राहिला आहे. त्यामुळे सर्वच भाविक चौथऱ्याच्या खालूनच दर्शन घेत आहेत. दररोज सकाळी व संध्याकाळी आरतीकरिता काही लोकांना सशुल्क चौथऱ्यावर जाता येत होते. भूमाता रणरागिणी महिला ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या आंदोलनामुळे महिलांना मुभा मिळाली नसली तरी पुरुषांचेही दर्शन बंद झाले आहे. सध्या शनिदेवाच्या भोवती कठडे तयार करण्यात आले आहे.