20 January 2018

News Flash

शरद पवार, अजित पवारांपेक्षाही मुख्यमंत्री कर्तबगार – उदयनराजे

शरद पवार आणि अजित पवारांपेक्षाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कामाचा उरक जास्त आहे. ते व्यक्तिगतपेक्षा सामाजिक प्रश्न मार्गी लावत आहेत.

वार्ताहर, सातारा | Updated: June 25, 2014 2:35 AM

शरद पवार आणि अजित पवारांपेक्षाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कामाचा उरक जास्त आहे. ते व्यक्तिगतपेक्षा सामाजिक प्रश्न मार्गी लावत आहेत. ते सर्वाधिक कर्तबगार मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना बदलण्याऐवजी त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका लढविल्या जाव्यात, असा घरचा आहेर खासदार उदयनराजे भोसले यांनी आज येथे राष्ट्रवादीला दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकाद्वारे उदयनराजे यांनी ही टीका केली आहे, यात पुढे म्हटले आहे, की  विधानसभेच्या निवडणुका दोनतीन महिन्यांवर आल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीकडून पसरवले जाणारे बदलाचे चित्र हितावह नाही. नवा चेहेरा आणल्यास कमी काळात त्याला काही करता येणे शक्य नाही. यामुळे मुख्यमंत्री बदलाची कारणमीमांसा न पटणारी आहे. चव्हाण यांनी राज्याचे अनेक प्रश्न चांगल्या प्रकारे हाताळले आहेत. दबाब असतानाही चांगले निर्णय घेतले आहेत. चव्हाणांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांनी समाजाभिमुख निर्णय घेतले आहेत. ते अभ्यासू आणि उत्तम प्रशासक आहेत. यामुळे खरेतर आजवरच्या सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांची कामगिरी ही सर्वोत्तम आहे. त्यामुळे त्यांना विरोध करण्यापेक्षा त्यांच्यामागेच एकदिलाने उभे राहत आगामी निवडणुका लढविण्याचे आवाहन उदयनराजे यांनी या वेळी केले.

First Published on June 25, 2014 2:35 am

Web Title: sharad pawar ajit pawar udayanraje
 1. M
  Mayur
  Jun 25, 2014 at 7:43 pm
  या राजांपुढे तथाकथित जाणता राजा हतबल झालेला दिसतो. उदयन राजे हे राष्ट्रवादीचे अवघड जागी दुखणे झाले आहेत​. त्यांची टीका मुकाट न करायची आणि निवडणुका आल्या ही त्यांचेच पाय धरायला जायचे, हे हतबलतेचेच लक्षण आहे.
  Reply
  1. V
   Vachak
   Jun 25, 2014 at 3:23 pm
   बऱ्याच वर्षांनी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाणांच्या रूपाने एक उच्चशिक्षित मुख्यमंत्री मिळाला. भले त्यांच्यामागे m base नसो किंवा electoral merit नसो, त्यांचा परदेशातला इंजिनियरिंगचा अनुभव आज मुंबई आणि महाराष्ट्राला लाभदायक ठरतो आहे. आम्हा मुंबईकरांना असाच मुख्यमंत्री हवा होता. तेव्हा सोनिया गांधीनी कुणाच्या कोल्हेकुईला भीक न घालता मुख्यमंत्रीबदल करू नये. परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पारडे जरा बरे राहील. अर्धवट शिवसेनेपेक्षा काँग्रेस कधीही परवडली.
   Reply
   1. P
    Prasad
    Jun 26, 2014 at 12:32 pm
    उदयन राजे अतिशय योग्य बोलले आहेत. भारतातील राज्यांमध्ये जे कोणी सज्जन, उच्चशिक्षित मुख्य्मंत्री आहेत त्यात पृथ्वीराज आहेत. आधीच नरेंद्र मोदीनी व अनेक घोटाळ्यांनी कोन्रेसची वाट लागली आहे. त्यात चव्हाण ह्यांच्या जागी कोणी राष्ट्रवादीचा कोणी झंप्या आला व कोङ्ग्रेसचा दुसरा कुणी 'जनाधार' असलेला झंप्या आला तर निवडणूकीत पुरते वाटोळे होईल.
    Reply
    1. R
     ram
     Jun 25, 2014 at 10:32 am
     खर सत्य हे उदयनराजेच सांगू शकतात .पृथ्वीराज चव्हाण हे खरेच चांगले मुख्यमंत्री आहेत. अजित पवारांनी विकास काही केला नाही .मराठा मराठा म्हणून मराठ्यासाठी काहीच केले नाही.
     Reply
     1. S
      Salil Kamat
      Jun 25, 2014 at 9:17 am
      उद्यान"राजे" बर्याच वेळा खरे बोलतात त्यापैकी हि एक वेळ आहे. ते जे म्हणाले ते पूर्णपणे बरोबर आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादी कदाचित निवडून येणार नाही पण आलेच तर परत पृथ्वीराज मुख्यमंत्री होवोत हि इच्चा. कारण खरोखर समाजाभिमुख निर्णय, व्यक्तिगत गोष्टीन ठार नाही हि त्याचं इवैशिश्त्ये फार चं. नाहीतर विकासाच्या नावाखाली "भकास" बनविणारे आणि करोद्पातींचे "पालान्हार" काय करणार ते इतकी वर्षे पहिले आहे आपण तेव्हा lokani आता विचार पूर्वक मतदान karave फक्त आपला मतदारसंघ baghun nave नहितेअर �दर्श"होवून suddha ...
      Reply
      1. N
       narendra kale
       Jun 25, 2014 at 8:28 am
       घरचा आहेर अनेक वेळा आत्म परीक्षण करण्यासाठी उपयुक्त असतो आणि अंती हितावह ठरतो खोटी स्तुती करणार्यापेक्षा ह्याचे महत्व आहे.प्रामाणिक माणूस सर्वांनाच अडचणीचा वाटतो.त्यामुळे काराने खाणार्यांना तो नकोच असतो.त्यांना त्यांच्या सारखाच कारी हवा असतो.आतापर्यंत कोन्ग्रेस्सने हीच संस्कृती जोपासली गेली ५० वर्षे.वरून कीर्तन आतून तमाशा.
       Reply
       1. S
        SHRIRAM ram
        Jun 26, 2014 at 3:12 pm
        अजित दादा पेक्षा शेजारच्या कराडचे बाबा परवडले मुख्यमंत्री म्हणून ....
        Reply
        1. S
         SHRIRAM ram
         Jun 26, 2014 at 2:56 pm
         अजित दादा पेक्षा शेजारच्या कराड चे बाबा परवडले मुख्यमंत्री म्हणून... असे तर सुचवायचे नाही na rajyanna !!!!
         Reply
         1. S
          SHRIRAM ram
          Jun 26, 2014 at 2:58 pm
          अजित दादा पेक्षा शेजारच्या कराडचे बाबा परवडतील मुख्यमंत्री म्हणून .... असे तर सुचवायचे नाही ना राजेना !!!!
          Reply
          1. P
           Pant
           Jun 25, 2014 at 9:20 am
           ा पटतेय हे
           Reply
           1. V
            Vishwajeet
            Jun 25, 2014 at 9:58 pm
            उदयन राजे बोलतात तेव्हा ते कुणाचीही ठेवत नाहीत. बरोबर बोललेत. पवार काका-पुतण्या विरुध्द कॉंग्रेस- राष्ट्रवादीत कुणाची हिम्मत नाही. कृषिमंत्री म्हणून पवारांनी काय केले हे दिसले आहेच, अजित पवारांनी पण "सिंचन" खात्यात बरेच "कमावलेय". पृथ्वीराज चव्हाण दोघापेक्षा सरस आहेत. आता बघा उदयन राजेंना राष्ट्रवादीतले कुणीच काहीच बोलणार नाही, शरद पवारांची सर्वांना तशी तंबी आहे. कारण उदयनराजेंचे राष्ट्रवादीवाचून काहीच आडलेले नाही हे पवारांना माहित आहे. तोंड दाबून बुक्क्याचा मार न करणे हेच पवारांच्या हाती आहे.
            Reply
            1. सुहास
             Jun 25, 2014 at 2:21 pm
             पवारांना जरुर नाव ठेवा पण त्याचबरोबर साताऱ्याची काय दशा आहे हे एकदा बघावे. एका बाजूला पुणे दुसऱ्या बाजूला कोल्हापूर अशी महानगरे, चार पदरी महामार्ग, रेल्वे, कृष्णेचे मुबलक पाणी असताना साताऱ्यात उद्योग व्यवसाय का येत नाहीत? उद्योग-व्यवसाय नसल्यामुळे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होते. हे स्थलांतराचे प्रमाण इतके आहे की सातारा जिल्ह्यातील विधानसभेचे दोन आणि लोकसभेचा एक मतदारसंघ रद्द झाला. घरटी एक तरुण पुणे-मुंबई किंवा अन्यत्र नोकरीसाठी धाव घेत असतो.
             Reply
             1. S
              sumant
              Jun 25, 2014 at 9:50 am
              .Chauhan graduated in mechanical engineering from the Birla Insute of Technology and Science, Pilani, and holds a Master of Science degree from the University of California, Berkeley. He wrote articles on computer science; engineering design; and also contribution to research in computerization.
              Reply
              1. P
               Praphull
               Jun 25, 2014 at 9:45 am
               राजे आपल्या मताशी आम्ही मत आहोत..
               Reply
               1. U
                Umesh
                Jun 25, 2014 at 10:58 am
                राजे बरोबर आहे. पण पवारांना कोण सागणार ते नटून बसलेत पदासाठी
                Reply
                1. V
                 vasudeo kelkar
                 Jun 25, 2014 at 7:57 am
                 अगदी बरोबर हे मुक्ख्यामंत्री सुशिक्षित आणि सुसंस्कारित सुद्धा आहेत.
                 Reply
                 1. Load More Comments