News Flash

पद्मसिंह पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारताच पत्रकार परिषदेत भडकले शरद पवार

असे प्रश्न येणार असतील तर मला बोलवत जाऊ नका असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे

राष्ट्रवादी काँग्रेसमधून पक्ष सोडून अनेक नेते भाजपा आणि शिवसेनेत जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातली जनता हे चित्र पाहतेच आहे. अशावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पद्मसिंह पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता आणि नातेवाईक असा उल्लेख केला असता ते चांगलेच संतापलेले पाहण्यास मिळाले. श्रीरामपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना एका पत्रकाराने शरद पवार यांना पद्मसिंह पाटील जे तुमचे नातेवाईक आहे तेही तुमची साथ सोडून जाण्याच्या तयारीत आहेत असं कळतं आहे असं पत्रकाराने विचारताच शरद पवार चांगलेच संतापले. राजकारणात नातेवाईकांचा काय संबंध? तुम्ही चुकीचं बोलत आहात, असं बोलणार असाल तर मला या पत्रकार परिषदेला कशाला बोलवायचं? माफी मागा, राजकारण आणि नातेवाईक यांचा काय संबंध? असा प्रश्न शरद पवारांनी विचारला आणि ते पत्रकार परिषद सोडून जाऊ लागले. इतक्यात त्यांना इतर पत्रकारांनी बसवलं आणि प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला शांत बसण्यास सांगितलं.

त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसला जी काही गळती लागली आहे अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत असं त्यांना विचारलं गेलं तेव्हा त्यावर त्यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले विकासाची वाट धरुन आम्ही राष्ट्रवादी सोडतो आहोत असे नेते सांगत आहेत. असं सांगून राष्ट्रवादी सोडणारे नेते हे विसरुन गेले आहेत की इतकी वर्षे त्यांचा विकास राष्ट्रवादीमध्ये असतानाच झाला. आता सेना भाजपाने त्यांना कोणत्या विकासाची वाट दाखवली म्हणून ते तिकडे जात आहेत ते कळू शकलेलं नाही असाही टोला शरद पवार यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना लगावला. मात्र पद्मसिंह पाटील यांचा उल्लेख नातेवाईक असा करताच शरद पवार चांगलेच चिडले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 2:50 pm

Web Title: sharad pawar angry on press reporter in shrirampur press conference scj 81
Next Stories
1 संभाजी भिडे गुरुजी उदयनराजेंच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण
2 Maharashtra SSC supplementary result 2019 :दहावी फेरपरीक्षेत २२.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, असा पाहा निकाल
3 सोलापूर – शिवशाही बसचा भीषण अपघात, एक ठार; ११ जखमी
Just Now!
X