28 October 2020

News Flash

प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये – शरद पवार

शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत मात्र त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही अशी टीका करणाऱ्या भारिप नेते प्रकाश आंबेडकरांना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी उत्तर दिलं आहे

शरद पवार

शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत मात्र त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही अशी टीका करणाऱ्या भारिप नेते प्रकाश आंबेडकरांना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. भाजपाची मदत घेणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.

‘राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष धर्मनिरपेक्ष नसता तर अकोल्यात दोन निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नसता. तिथे शरद पवार प्रचाराला गेले नव्हते. तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. ते धर्मनिरपेक्ष आहेत असं तेव्हा वाटत होतं, आता वाटत नाहीत’, असंही शरद पवार म्हणाले आहेत. भाजपाला लाभ पोहोचवण्यासाठी उमेदवार उभे करण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारे लोक इतरांना कोण धर्मनिरपेक्ष आहे आणि कोण नाही हे सांगतात असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत, मात्र त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं. तसंच, २०१४च्या निवडणुकीनंतर शिवसेना भाजपाला पाठिंबा द्यायला तयार नव्हते याची आठवण त्यांनी करून दिली होती. तेव्हा राष्ट्रवादीने आमदारांच्या दबावाखाली सरकारला बाहेरून पाठिंबा दिला, त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर जाण्यात आम्हाला अडचण आहे असे आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले.

संभाजी भिडेंचा संदर्भ देताना, भिडेची पिलावळ राष्ट्रवादी मध्ये आहेत, उदयनराजे हे भिडेंची बाजू मांडतात मग त्यांच्या प्रचाराला आम्ही कसं जाणार? असा सवालही आंबेडकरांनी विचारला. काँग्रेस बरोबर आम्हाला युती करायची आहे, त्यासाठी आम्ही तयार आहोत, मात्र काँग्रेसच्या मित्रांबरोबर नाही असे त्यांनी स्पष्ट केले. ओवेसींच्या एमआयएम बरोबर युती करणार, निवडणूक लढवणार, आता मागे फिरणार नाही याची ग्वाही आंबेडकरांनी यावेळी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 6:30 pm

Web Title: sharad pawar ansers back to prakash ambedkar
Next Stories
1 मराठी शिक्षकांना गुजराती वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा ‘विनोद’
2 एकाच मंडपात बाप्पाची आरती आणि अजान, मुंब्राच्या एकता मंडळाचा अनोखा आदर्श
3 पुणे – सेक्स करण्यास नकार दिल्याने समलैंगिक पार्टनरवर कोयत्याने हल्ला
Just Now!
X