राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस साजरा केला जात आहे. राष्ट्रवादीच्या वतीने दुपारी वाय.बी. चव्हाण सभागृहात ८ दशकं कृतज्ञतेची कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर सायंकाळी शरद पवार यांनी कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ खासदार सु्प्रिया सुळे यांनी सोशल केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी सकाळी पोस्ट करून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या होत्या. सुळे यांनी वडिलांसोबत एक फोटो पोस्ट करुन, अभिष्टचिंतन केलं होतं. “वयाची आठ दशकं पार करत असताना आदरणीय शरद पवार साहेब आजही तेवढेच उत्साही आहेत. त्यांची अविरत काम करण्याची ऊर्जा आम्हा सर्वांना प्रेरणा देऊन जाते. साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात राष्ट्रवादीच्यावतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. रक्तदान शिबिरासह सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2020 5:09 pm