News Flash

रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड

उपाध्यक्षपदी सहा जणांची निवड

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. (संग्रहित छायाचित्र)

वाई : रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी नवी मुंबई येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांची निवड झाली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांची आगामी तीन वर्षांसाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

आशिया खंडात सर्वात मोठा विस्तार असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची आगामी तीन वर्षासाठी निवड करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संस्थेच्या जनरल बॉडीची सभा आज झाली. रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड दर तीन वर्षानी केली जाते. या निवडी आजवर कर्मवीरांच्या पुण्यतिथी दिवशी म्हणजेच नऊ मे रोजी केल्या जातात. यंदा करोनामुळे या निवडी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आज सुरक्षित अंतराचे नियम पाळून जिल्हा परिषदेच्या सभागृहात सभा झाली. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्यासह सर्व जनरल बॉडीचे सदस्य उपस्थित होते.

संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, जयश्री आनंदराव चौगुले, अरूण पुंजाजी कडू-पाटील, पी.जे.पाटील, आमदार चेतन विठ्ठलराव तुपे यांची निवड करण्यात आली आहे. उच्च शिक्षण सहसचिवपदी येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.प्रतिभा गायकवाड यांची तसेच माध्यमिक शिक्षण सहसचिवपदी नगर येथील संजय नागपूरे यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी  मॅनेजिंग कौन्सिल सदस्यांचीही निवड करण्यात आली.

सचिवपदासाठी अनेकांची नावे चर्चेत होती. मात्र, बैठकीत प्राचार्य डॉ. शिवणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आज निवडलेले मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य पुढीलप्रमाणे : डॉ.अनिल पाटील, अॅड.भगीरथ शिंदे, दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, रामशेठ ठाकूर, ऍड.रविंद्र पवार, मीनाताई जगधने, डॉ.विश्वजीत कदम, प्रभाकर देशमुख, दादाभाऊ कळमकर, बाबासाहेब भोस, मुमताजअली शेख, डॉ.यशवंत थोरात, रामचंद्र गायकवाड, कृष्णराव घाटगे, प्रिं.डॉ.भारत जाधव, प्रो.डॉ.शिवलिंग मेनकुदळे, चंद्रकांत वाव्हळ, डॉ.भाऊसाहेब कराळे, विलास महाडिक, प्रिं.डॉ.गणेश ठाकूर, ऍन्थोनी ऍलेक्‍स डिसोझा, तुकाराम कन्हेरकर, प्रा.डॉ.काळुराम कानडे आदी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 7:07 pm

Web Title: sharad pawar elected as rayat education society president bmh 90
Next Stories
1 वारकऱ्यांच्या वेशात विठुरायाचे दर्शन; गृहमंत्र्यांनी घातलं साकडं
2 पुन्हा लॉकडाउन; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात १ ते ८ जुलै या काळात लागू होणार कडक निर्बंध
3 सासरी आलेला जावई करोनाबाधित निघाल्याने गावात खळबळ; संपर्कात आलेले झाले क्वारंटाइन
Just Now!
X