07 August 2020

News Flash

फडणवीसांनी राजकारण करण्यापेक्षा करोनाच्या कामात लक्ष द्यावं, पवारांचा सल्ला

नाशिकमधल्या पत्रकार परिषदेत बोलत होते शरद पवार

देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण करण्यापेक्षा करोना दूर कसा पळवता येईल या कामावर लक्ष द्यावं असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. करोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत.उद्धव ठाकरे यांची नाशिकला येण्याची इच्छा होती. मात्र आम्ही आमचं निरीक्षण मुख्यमंत्र्यांना कळवणार आहोत. मात्र त्यांचं पूर्ण राज्यात लक्ष आहे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

करोनाच्या चाचण्या वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे. ज्यात ते असं म्हणाले आहेत की या काळात राजकारण करण्यापेक्षा करोना काळात त्यांनी काम करावं आणि करोना दूर कसा घालवता येईल ते बघावं असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे. तसंच सध्याचा काळ हा कोणतंही राजकारण करण्याचा काळ नसून सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याचा आहे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सातत्याने करोना रुग्णांच्या संख्येवरुन, चाचण्यांवरुन ठाकरे सरकारवर टीका करत आहेत. महाराष्ट्रात अनेक करोना मृत्यू दडवण्यात आले आहेत असाही आरोप त्यांनी केला होता. तसंच करोना चाचण्या वाढवण्यात याव्यात म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं होतं. नाशिकमध्ये याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण करण्यापेक्षा करोना काळात मदत करावी आणि सहकार्याच्या भावनेनं काम करावं असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 7:20 pm

Web Title: sharad pawar gave advise to mr devendra fadanvis about his politics scj 81
Next Stories
1 टाळेबंदीपूर्वी उसळलेल्या गर्दीने यवतमाळात करोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता
2 पंढरपुरात एकाच दिवशी २५ जण करोनामुक्त
3 “…ती वेळ येऊ देऊ नका”; सेवा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या डॉक्टरांना पवारांचा इशारा
Just Now!
X