02 April 2020

News Flash

अखेर पवारांनी शब्द पाळला, प्रशासनाचे अद्यापही दुर्लक्षच

आत्महत्याग्रस्त शेतकरी दिलीप ढवळे यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. तर घटनेला जबाबदार असणार्‍या संबंधित लोकांवर पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मनाबादमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाला दिलेले नोकरीचे आश्वासन अखेर पूर्ण केले आहे. १२ एप्रिल रोजी उस्मनाबादमधील तडवळामधील दिलीप ढवळे यांनी ओम राजेनिंबाळकर यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान शरद पवार यांनी वेळ काढून ढवळे कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबाचे सांत्वन करत त्यांनी मुलाला नोकरीचे आश्वासन दिले होते. तीन जून रोजी दिलीप ढवळे यांच्या छोटा मुलगा निखील बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये कामासाठी रूजू झाल्याची माहिती राज ढवळे यांनी दिली.

शरद पवार साहेब येथून गेल्यानंतर इतर राजकीय लोकांप्रमाणे त्यांचे आश्‍वासनही विरुन जाईल असे वाटले. कारण सांत्वन करताना एक आधार म्हणून बोलणे आणि नक्कीच आधार देणे यात फार फरक असतो. आणि राजकारणातील लोकांकडून तरी अश्‍वासनाची पूर्तता होताना याची देही याची डोळा कधी आमच्या जिल्ह्यात तरी पाहिलेले नाही. म्हणून त्याही बाबतीत आमची उदासिनता कायम होती. परंतु साहेबांनी भेट देऊन चार दिवसही गेले नाहीत. मात्र, भेट दिल्यानंतर चार दिवसांत बारामतीहून विद्या प्रतिष्ठानमधून फोन आला. भावाची मयत झाल्यानंतरचे पुढचे विधी अजून झालेले नव्हते. त्यामुळे वेळ मागून घेतला. त्यानंतर एक दिवस निखील बारामतीला जाऊन भेटून आला. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला कामावर रूजू होण्यास सांगितले. अखेर तीन तारखेला तो कामावर रूजू झाला. असे राज ढवळे यानी सांगितले.

निवडणूका, प्रचार, निकाल या सगळ्या गोष्टी होत होत्या. तरीही पवार साहेब या व्यस्त कामातून वेळ काढून संस्थेमध्ये मला घेतले की नाही याची चौकशी करत होते. म्हणजे दिलेला शब्द पाळणे आणि तोही अगदी अल्पावधीत त्याची पूर्तता करणे हे त्यांच्यासारख्या एखाद्याच राजकीय व्यक्तीला शक्य असेल, अशी प्रतिक्रिया निखील यांनी दिली.

दरम्यान, आत्महत्याग्रस्त शेतकरी दिलीप ढवळे यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. तर घटनेला जबाबदार असणार्‍या संबंधित लोकांवर पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 11:10 am

Web Title: sharad pawar given job to osmanabad suicide family son
टॅग Sharad Pawar
Next Stories
1 MHT CET 2019 Result : एमएचटी-सीईटीचा निकाल झाला जाहीर
2 एचटी कापूस बियाण्यांची अवैध विक्री रोखण्याचे आव्हान
3 चारा छावण्यांसाठी किमान जनावरांची अट शिथिल
Just Now!
X